Next
राष्ट्रवादी अर्बन सेलचा ‘कुटुंबासाठी एक झाड’ उपक्रम
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सुरुवात
प्रेस रिलीज
Tuesday, June 04, 2019 | 05:40 PM
15 0 0
Share this article:


सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलतर्फे ‘इंडियाअॅट७२’ या मोहिमेंतर्गत राज्यभरात ‘कुटुंबासाठी एक झाड’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते सांगली येथील नेमिनाथनगर परिसरात वृक्षारोपणाने झाली. 

‘आपल्या भूभागाची परिस्थिती सध्या ढासळत आहे, म्हणूनच की जगभरात ग्लोबल वार्मिंग, पाण्याची टंचाई असे असंख्य प्रश्न भेडसावत आहेत. आपल्या पृथ्वीचे संवर्धन करण्यासाठी आपल्याला सरसावले पाहिजे,’ असे मत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे येत्या काळात राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिका क्षेत्रांत मेळावे घेवून विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत; तसेच वृक्ष संवर्धन व पर्यावरण संरक्षणासाठी महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. संपूर्ण नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रांत ग्रीन स्पेस विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, शहरातील विविध उघड्या जागांवर नागरिकांच्या मदतीने वृक्षलागवड, जपानी मियावाकी तंत्रज्ञानाप्रमाणे पाच चौरस फुटास झाडाची लागवड, नागरिकांमध्ये व युवकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती, रेन वॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात विविध जनजागृती कार्यक्रम व त्यांची अंमलबजावणी केली जाईल. जून ते ऑगस्ट दरम्यान विविध महानगरपालिका क्षेत्रात हे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली. ‘इंडियाअॅट७२’ या मोहिमेंतर्गत गेल्या ७२ वर्षांत देशाने घेतलेल्या उंच भरारीसंदर्भात शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, घेतल्या जातील.


या कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, मिरज शहराध्यक्ष अभिजीत हारगे, उद्योजक भालचंद्र पाटील, विद्यार्थी शहर जिल्हा अध्यक्ष शुभम जाधव, किशोर नावंधर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search