Next
दुर्राणी यांचा विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रेस रिलीज
Friday, July 06 | 05:07 PM
15 0 0
Share this story



नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबाजानी दुर्राणी यांनी पाच जुलै रोजी विधानभवनामध्ये विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार दुर्राणी यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुर्राणी यांना विधानसभा सदस्याद्वारा निर्वाचितमधून ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आहे.

या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले, विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, माणिकराव ठाकरे आदींसह दोन्ही पक्षाचे आमदार उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link