Next
शिरोळेंकडून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा
प्रेस रिलीज
Wednesday, June 20, 2018 | 01:45 PM
15 0 0
Share this storyपुणे : लोकसभा मतदारसंघात केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या आत्तापर्यंत झालेल्या अंमलबजावणीचा विस्तृत अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश खासदार अनिल शिरोळे यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे जीएम यू. व्ही. म्हस्के यांना दिले आहेत.

जन धन, स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना, जीवन ज्योती, अटल पेन्शन, सुरक्षा बिमा या केंद्र सरकारच्या विविध योजनांची पुणे लोकसभा मतदारसंघात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी खासदार शिरोळे यांनी या योजनांसाठीची लीड बॅंक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे जीएम म्हस्के यांची भेट घेतली.

या योजनांच्या अंमलबजावणीच्या आढाव्यासंबंधी १८ एप्रिल २०१८ रोजी खासदार शिरोळे यांनी सर्व संबंधित बँक अधिकाऱ्यांची एक बैठक देखील घेतली होती. या बैठकीत या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंबंधी विस्तृत चर्चा झाली होती. त्याचाच पुढील टप्पा म्हणून शिरोळे यांनी म्हस्के यांची भेट घेऊन पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघानुसार अंमलबजावणीसंबंधी एक सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

हा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरवण्यासाठी परत एकदा सर्व बँक अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक घेणार असल्याचे खासदार शिरोळे यांनी या वेळी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link