Next
भिवंडीत व्हेरिकोज व्हेन्स तपासणी शिबिर
BOI
Friday, November 23 | 02:56 PM
15 0 0
Share this story

भिवंडी : ठाणे येथील क्युरे हॉस्पिटलच्या वतीने व्हेरिकोज व्हेन्स तपासणी शिबिर २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी एक या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. भिवंडीतील द्रोण डायग्नोस्टिक येथे होणाऱ्या या शिबिरात व्हेरिकोज व्हेन्सचे ख्यातनाम तज्ज्ञ डॉ. शोएब पदारिया सर्व रुग्णांची अत्यल्प शुल्कात तपासणी करणार आहेत.

पायाचे घोटे, पोटऱ्या, ढोपर, मांडी या ठिकाणी फुगलेल्या, नागमोडी आणि दुखऱ्या शिरा (व्हेन्स) म्हणजेच व्हेरिकोज व्हेन्स. या समस्येने लाखो रुग्ण त्रस्त आहेत. हा विकार आनुवंशिक असून, पन्नाशीनंतरच्या ४० टक्के स्त्री-पुरुषांमध्ये दिसून येणारी ही समस्या दिसून येते. व्हेरिकोज व्हेन्सच्या त्रासाची तीव्रता वाढते, त्या वेळी त्याचे दुष्परिणाम पायांवर दिसून येतात. रुग्णाला उभे राहिल्यावर पायात खूप तीव्र वेदना होतात. त्या जागी सूज येते व काही काळानंतर त्वचा फाटून तिथे अल्सर होतो.

लठ्ठपणा हे व्हेरिकोज व्हेन्स होण्याचे मुख्य कारण आहे. खूप वेळ उभे राहून काम करणे, तसेच गरोदरपणामुळेही हा त्रास होतो. डॉ. पदारिया हे यातील तज्ज्ञ असून, त्यांना १४ वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी २० हजारांहून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.
 
शिबिराविषयी :
दिवस :
रविवार, २५ नोव्हेंबर २०१८
वेळ : सकाळी १० ते दुपारी एक
स्थळ : द्रोण डायग्नोस्टिक, एसटी स्टँडसमोर, भिवंडी.
नावनोंदणीसाठी संपर्क : ७५०७५ ०५४४३
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link