Next
चारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर
BOI
Thursday, June 13, 2019 | 11:43 AM
15 0 0
Share this article:

चारुदत्त आफळेपुणे : संगीत, नाट्य, कला क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या कलाकाराला पुणे महानगरपालिकेतर्फे दर वर्षी बालगंधर्व पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार प्रख्यात कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना जाहीर झाला आहे.

महापौर मुक्ता टिळक, विरोधी पक्ष नेते दिलीप बराटे, विरोधी पक्ष नेते उल्हास पवार, माजी आमदार अनुराधा राजहंस, डॉ. सतीश देसाई, उस्ताद फैय्याज हुसेन खान यांच्या समितीने आफळे यांची या पुरस्कारासाठी निवड केली.  

याशिवाय अरुण जगताप यांना नेपथ्यासाठी, अली हुसेन यांना गायनासाठी, तर कविता टिकेकर यांना गायक आणि कलाकार म्हणून आणि डिझाइनसाठी कुमार गोखले यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

‘पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या बालगंधर्व पुरस्कारासाठी माझी निवड झाली, ही खूप आनंदाची बाब आहे. त्याचवेळी हा एवढा मोठा पुरस्कार म्हणजे मोठी जबाबदारी आहे, याचीही जाणीव झाली आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून गेली चाळीस वर्षे मी संगीत रंगभूमीवर काम करत आहे, त्याचीच ही पुण्याई आहे, असे मला वाटते. बालगंधर्व यांची स्त्री वेशातील भूमिका मी दोन वेळा साकारली आहे. माझे गुरु, रसिक, कुटुंबीय यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्याचा मी नम्रपणे स्वीकार करतो आणि महानगरपालिकेने या पुरस्कारासाठी माझी निवड केली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो,’ अशी प्रतिक्रिया चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 62 Days ago
Kirtan is entertainment without vulgarity . That is certainly its merit .
0
0
BDGramopadhye About 69 Days ago
He is keeping our traditional activity alive . Best wishes . May he able to inspire others .
0
0
प्रा जनार्दन जगन्नाथ वाणी पेण About 71 Days ago
प पू हभप आफळे बुवा हार्दिक अभिनंदन
0
0
Padhye Bhavanishankar veral About 71 Days ago
अभिनंदन !! आफळे बुवा
0
0

Select Language
Share Link
 
Search