Next
‘फिनोलेक्स’च्या ‘वुमन्स वेल बीइंग’ शिबिराचे उद्घाटन
BOI
Monday, March 04, 2019 | 03:35 PM
15 0 0
Share this article:चिपळूण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक ते १५ मार्च २०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘वुमन्स वेल बीइंग’ या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

हे शिबिर डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटल येथे आयोजित केले आहे. उद्घाटन प्रसंगी चिपळूणच्या आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, अधीक्षक डॉ. हनकारे, सावर्डे येथील पोलीस निरीक्षक मंजुषा भोसले, आयएमए चिपळूनचे अध्यक्ष डॉ. मोहिते, वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय अध्यक्ष डॉ. सुवर्णा पाटील, वैद्यकीय सहाय्यक अध्यक्ष डॉ. नेताजी पाटील, वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. डोंबले, फिनॉलेक्स कंपनीचे सिनियर जनरल मॅनेजर तानाजी काकडे, सागर चिवटे, डॉ. अनुप करमरकर उपस्थित होते.

या शिबिराचे दर ‘फिनोलेक्स’ कंपनीतर्फे अनुदानित केले आहेत. शिबिराची वेळ सोमवार वगळून इतर सर्व दिवशी सकाळी नऊ ते दुपारी ४.३० अशी आहे. रुग्णांकडून त्यांचे स्वतःचे योगदान १०० रुपये असेल. उर्वरीत रक्कम ‘फिनोलेक्स’ देणार आहे. रुग्णांकडून घेण्यात येणारे १०० रुपये सैनिक कल्याण निधीसाठी वापरले जातील.या शिबिरादरम्यान महिलांच्या सोनो मॅमोग्राफी, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट– सीबीसी, ब्लड शुगर, युरिन, ब्रेस्ट क्लिनिकल एक्जामिनेशन बाय लेडी गायनॅकोलॉजिस्ट, फिजिशियन कन्सल्टेशन, गायनॅकोलॉजिकल कन्सल्टेशन, फिजिओथेरपी कन्सल्टेशन, डायट कन्सल्टेशन या तपासण्या केल्या जातील. ऑक्टोबर आणि मार्च महिन्यात ‘फिनोलेक्स’ आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे वर्षातून वेळा रत्नागिरीतल परकार हॉस्पिटलमधील वेल बीइंग क्लिनिकमध्ये मॅमोग्राफी शिबिराचे आयोजन केले जाते. वर्षाला ५०० महिलांच्या तपासण्या व उपचारांबाबत मार्गदर्शन केले जात असून, शिबिरादरम्यान पुण्यातील प्रशांती कॅन्सर केअर सेंटरमधील विशेषज्ञ येथे भेट देऊन निदानाबाबत मार्गदर्शन करतात.

या व्यतिरिक्त, २००८पासून रत्नागिरीतील खासगी, तसेच जिल्हा परिषद शाळांमधून वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले जाते. आरोग्य तपासणीदरम्यान वर्षातून १६ हजार विद्यार्थ्यांची दंत, दृष्टी, कान-नाक-घसा हृदय आणि थायरॉइड या तपासण्या केल्या जातात. त्यासाठी पुण्यातील केईएम, ससून जनरल हॉस्पिटल, भारती विद्यापीठ या नामवंत रुग्णालयांसह रत्नागिरीतील डॉक्टरांच्या मदतीने तपासणी केल्या जातात. शिबिरानंतर पुढील उपचारांची गरज असलेल्या मुलांना पुणे किंवा रत्नागिरीमध्ये उपचारांसाठी पाठपुरावा केला जातो.

‘फिनोलेक्स’च्या कर्मचाऱ्यांसाठीही मधुमेह, तोंडाचा कर्करोग आणि इतर साधारण गोष्टींसाठी वार्षिक तपासणी शिबिरे घेतली जातात; तसेच रक्तदानात सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित करण्यात येते. मे २०१७मध्ये फिनोलेक्स कॉलनी येथे सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांसाठी सुरू केलेल्या पुनर्वसन केंद्रात गरजू रुग्णांची संख्या वाढत आहे. आजपर्यंत सातारा आणि रत्नागिरी मिळून ९८६ सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुले आहेत. सकाळी नऊ ते सहा या प्रमाणे आठवड्यातील सहा दिवस थेरपी देण्यासाठी थेरापिस्ट उपलब्ध आहेत. पुण्यातील विशेषज्ञांकडून मासिक न्युरोफिजिओथेरपी शिबिर घेतले जाते.
 
इंडियन मेडिकल असोसिएशन, रत्नागिरी आणि पुण्यातील संचेती हॉस्पिटलच्या सहयोगाने सेरेब्रल पाल्सी आणि त्यासाठी लवकर निदान आणि वेळेत उपचार करून पुढील समस्या टाळता येऊ शकता हे सांगणाऱ्या पहिल्या कन्टिन्युअस मेडिकल एज्युकेशनचे (सीएमई) आयोजन केले होते. या ध्येयाचा पुढील टप्पा म्हणून आशा आणि एएनएम नर्सेसना आधीच्या स्तरावरील सेरेब्रल पाल्सीचे निदान करून त्यावरील उपचारांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. ‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’च्या सहयोगाने आरोग्य, शिक्षण, पाणी संवर्धन, समाज कल्याण आणि स्वच्छता अशा विविध क्षेत्रांत काम करण्यात आले आहे. याव्यतिरिक्य ‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’ यांच्यातर्फे रुग्णालयातील आणि वैद्यकीय संस्थामधील सेवा अद्यावत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search