Next
‘महाराष्ट्र आर्थोपेडिक डे’ निमित्त आठवडाभर उपक्रम
महाराष्ट्र आर्थोपेडिक असोसिएशनतर्फे आयोजन
BOI
Wednesday, April 24, 2019 | 03:13 PM
15 0 0
Share this article:

महाराष्ट्र आर्थोपेडिक असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देताना (डावीकडून) डॉ. गोवर्धन इंगळे, डॉ. संजय पाटील, डॉ. निलेश जगताप, डॉ. पराग संचेती, डॉ. चंद्रशेखर साठ्ये

पुणे : ‘महाराष्ट्र आर्थोपेडिक डे’चे (एक मे) औचित्य साधून महाराष्ट्र आर्थोपेडिक असोसिएशनतर्फे (एमओए) २८ एप्रिल ते पाच मे २०१९ दरम्यान विविध जागरूकता उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या वर्षी हे उपक्रम प्रि-हॉस्पिटल ट्रॉमा केअर (अपघातग्रस्त व्यक्तीला रूग्णालयात दाखल करेपर्यंत घ्यावयाची काळजी) आणि नागरिकांचा सहभाग यावर केंद्रित आहेत,’ अशी माहिती संचेती हॉस्पिटल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ‘एमओए’चे माजी अध्यक्ष डॉ. पराग संचेती, सदस्य डॉ. चंद्रशेखर साठ्ये, डॉ. गोवर्धन इंगळे आणि ‘पीओएस’चे सचिव डॉ. संजय पाटील यांनी दिली.

दुर्दैवाने कुठला अपघात झाला, तर आजही लोक मदतीचा हात पुढे करायला धास्तावतात;पण हा भीतीचा दृष्टीकोन काढून टाकणे गरजेचे आहे. अपघात झालेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी कशी मदत करावी, काय काळजी घ्यावी याची माहिती आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमांद्वारे दिली जाणार आहे. लोकांनी अशा प्रसंगी अधिक संवेदनशीलतेने मदतीचा हात पुढे करावा, हा या उपक्रमांमागचा हेतू आहे. या उपक्रमांमध्ये शैक्षणिक कार्यक्रम, शिबिरे, पथनाट्य व चित्रफितींचा समावेश असेल.

डॉ. पराग संचेती म्हणाले, ‘अपघातग्रस्त व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी ज्या प्रकारे काळजी घेतली जाते, त्यामुळे उपचारांच्या परिणामांना एक दिशा मिळू शकते. त्यामुळे आपल्या मनात असलेली भीती बाजूला ठेऊन अपघातग्रस्त व्यक्तींना नेहमी मदत करावी. तत्परतेने उचलेले हे छोटे पाऊल अनेक लोकांना जीवदान देऊ शकते. त्याचबरोबर अनेक लोकांना हे माहित नसते, की अपघातग्रस्त लोकांना नक्की कशी मदत करावी. आमच्या या उपक्रमांद्वारे अपघातप्रसंगी नक्की काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती दिली जाईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search