Next
‘मायक्रोसॉफ्ट’, ‘स्पेक्टाकॉम’ आणि ‘स्टार इंडिया’तर्फे पॉवर बॅट सादर
प्रेस रिलीज
Monday, October 15 | 01:02 PM
15 0 0
Share this story

मुंबई : मायक्रोसॉफ्ट कॉर्पो. आणि अनिल कुंबळे यांच्या स्पेक्टाकॉम टेक्नॉलॉजीस या टेक्नॉलॉजी स्टार्टअपने ब्रॉडकॉस्ट भागीदार स्टार इंडियाच्या पाठिंब्याने एकत्र येत पॉवर बॅटच्या सादरीकरणाची नुकतीच घोषणा केली. पॉवर बॅटच्या माध्यमातून खेळाडू, प्रशिक्षक, समालोचक, चाहते व प्रेक्षकांना खेळाशी जोडले जाण्यासाठी आणि त्यांचा खेळ सुधारण्यासाठी एक संपूर्णपणे नवा व अनोखा मार्ग उपलब्ध होणार आहे. या सगळ्याला मायक्रोसॉफ्ट अझुरे क्लाउड व्यासपीठावर एआय आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) सेवा वापरून पाठबळ दिले जाणार आहे.

मायक्रोसॉफ्ट आपल्या स्केल अप उपक्रमाचा भाग म्हणून हे उत्पादन तयार करण्यासाठी आणि त्याच्या सादरीकरणासाठी स्पेक्टाकॉम आणि त्याचे संस्थापक, तसेच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्यासोबत सखोल काम करत आहेत. स्टार इंडिया या भारतातील आघाडीच्या क्रिकेट ब्रॉडकास्ट वाहिनीने नुकत्याच झालेल्या मालिकेत थेट ओव्हलवरून प्रत्यक्ष आकडेवारी आणि माहिती पुरवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला.

‘स्पेक्टाकॉम आणि स्टार इंडियातर्फे चाहते, खेळाडू व प्रशिक्षकांचा क्रिकेट अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कामाचा भाग होताना आम्हालाही आनंद होत आहे. इतर क्षेत्रांमध्ये एकमेकांशी जोडलेल्या उपकरणांमुळे काय परिणाम घडून येतो, हे आम्ही पाहिले आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, आमच्या एआय व क्लाउड सेवांमधील या विकसित रूपामुळे फक्त क्रिकेटच नाही, तर सर्व खेळांसाठी जे काही शक्य आहे, त्याची आता फक्त सुरुवात झाली आहे,’ असे मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी उपाध्यक्ष पेगी जॉनसन यांनी सांगितले.  

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि ‘स्पेक्टाकॉम’चे संस्थापक कुंबळे म्हणाले, ‘प्रत्यक्ष खेळाच्या विश्लेषणासह विविध उत्सुकतापूर्ण माध्यमातून प्रेक्षकांचा सहभाग वाढवून त्यांना खेळाच्या अधिक जवळ आणणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. त्याचवेळी हेही पाहणे महत्त्वाचे आहे की, यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान सहज, उत्कृष्ट असेल आणि त्यामुळे खेळात किंवा खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा अडथळा जाणवणार नाही. मायक्रोसॉफ्टमुळे स्टार इंडियाच्या साह्याने आम्ही एक सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय निर्माण करू शकलो. प्रेक्षकांच्या सहभागाला चालना देऊ शकेल आणि त्यात उत्सुकता आणू शकेल, असा भागीदार आता आमच्यासोबत आहे.’

पॉवर बॅट ही एक अनोखी संकल्पना आहे. यात एक हलके, अझुरे स्‍फेअरचलित स्टीकर बॅटच्या शोल्डरला लावले जाईल. याचा कोणत्याही प्रकारचा व्यत्यय किंवा अडथळा नसेल. लाइव्ह सामन्यात फलंदाजाने चेंडूला फटका मारताक्षणी वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी (वेगाचा परिणाम, ट्विस्टचा परिणाम, शॉटचा दर्जा- बॅटवर ज्या ठिकाणी चेंडू लागला तेथील सान्निध्यतेची टक्केवारी) पॉवर स्पेक या नव्या मोजमाप एककात नोंदवली जाईल. ही माहिती सुरक्षितरित्या साठवली जात आहे आणि त्यावर योग्य प्रक्रिया होते आहे, याची खातरजमा मायक्रोसॉफ्टच्या अझुरे स्फेअरकडून केली जाईल. अझुरेवरील आधुनिक विश्लेषण आणि एआय सेवांचा वापर करून स्टम्प बॉक्सच्या माध्यमातून प्रत्यक्ष माहिती गोळा केली जाईल आणि प्रसारकाच्या माध्यमातून ती झळकवली जाईल. सराव किंवा प्रशिक्षणाच्या काळातही मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही माहिती पाहता येईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link