Next
विणकर सेवा केंद्रातर्फे हस्तकला सहयोग शिबीराचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, October 11 | 04:49 PM
15 0 0
Share this story

मुंबई :  हस्तकला आणि देशी वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय देशभरात २०० ‘हस्तकला सहयोग शिबीर’ आयोजित करत आहे. ७ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत, महाराष्ट्रात तीन ठिकाणी ही शिबीरे आयोजित केली जाणार आहेत. ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय गरीब कल्याण वर्ष’ला समर्पित असा हा उपक्रम आहे.

या शिबीरात, विणकरांना कर्जाची हमी, हातमाग, यंत्रमाग तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण, वस्त्रोद्योग पास-बुक, इग्नू किंवा एनआयओएस सारख्या संस्थांच्या अभ्यासक्रम प्रवेशांसाठी मदत, प्रदर्शनं आणि खरेदीदार-विक्रेते बैठकांसाठी मदत अशा प्रकारचे सहाय्य केले जाईल.

मुंबई विणकर सेवा केंद्रातर्फे ही तीन शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. औरंगाबाद येथे १२ ऑक्टोबरला महारती पैठणी केंद्रात, नाशिक जिल्ह्यात येवला येथे डॉ. हेडगेवार सभागृहात १३ ऑक्टोबरला तर सोलापूर एमआयडीसीत यंत्रमागधारक संघाच्या आवारात १६ ऑक्टोबरला हे शिबीर होईल. औरंगाबाद येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नाशिक येथे खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि सोलापूर येथे खासदार शरद बनसोडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link