Next
पिंपळपान भाग ५
BOI
Wednesday, August 01, 2018 | 10:00 AM
15 0 0
Share this story

साहित्य हे कालातीत असते, याची प्रचिती काही दिग्गज लेखकांनी लिहिलेल्या लेखनातून येते. या पुस्तकातील सहा कसदार कथा अशाच थोर लेखकांच्या लेखणीतून उतरल्या आहेत. या कथा गेल्या शतकातील असल्या, तरी चालू शतकातही त्यांचे संदर्भ संपलेले नाहीत.

या कथांमधील पात्रे आजही आपल्याला आसपास वावरताना दिसतात आणि सामाजिक स्थिती, प्रश्नही बदललेले नाहीत. त्यामुळे त्या वास्तवाला भिडणाऱ्या आहेत. गंगाधर गाडगीळ यांची ‘निरोप’, आनंद मसलेकर यांची ‘वीकएंड’, राजा राजवाडे यांची ‘कहाणी’, श्री. ज. जोशी यांची ‘प्लीज... पुन्हा नको’, ग. ह. गुर्जरपाध्ये यांची ‘अॅन अफेअर टू रिमेंबर’ आणि राम कृष्ण जोशी यांनी ‘पाणी निवळत होतं’ मध्यमवर्गीय भावविश्व उलगडून दाखविणाऱ्या या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा आहेत.

प्रकाशक : कौशिक प्रकाशन
पाने : २१४
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link