Next
‘माहितीपटासाठी स्वतंत्र दूरचित्रवाहिनी असावी’
प्रेस रिलीज
Tuesday, January 30 | 05:18 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत बोलताना चित्रपट निर्माते गौतम घोषमुंबई : ‘माहितीपट चळवळीला चालना देण्यासाठी तसेच माहितीपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी एक स्वतंत्र महितीपटासाठी समर्पित अशा वाहिनीची गरज आहे,’ असे मत ख्यातनाम चित्रपट निर्माते गौतम घोष यांनी व्यक्त केले. मुंबईत आयोजित ‘मिफ २०१८’ दरम्यान घोष यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

‘लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेशन अशा सर्व चित्रपटांना ‘मिफ महोत्सवा’त दिले जाणारे प्राधान्य, महोत्सवाचे सातत्य, आणि महोत्सवाने जपलेले आपले स्वतंत्र अस्तित्व यामुळे हा महोत्सव आपल्या देशाचा अभिमान आहे. माहितीपट क्षेत्रातील नव चित्रपट निर्मात्यांनी आपल्या विषयाप्रती प्रेम, तो विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याची, तो सादर करण्याची जिद्द, आणि इतर कलाकृतींबद्दल आदर ठेवल्यास एका खऱ्या माहितीपटाची निर्मिती होईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘दर्जेदार चित्रपट कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी एक उत्तम व्यासपीठ ‘मिफ’मुळे निर्माण झाले आहे त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून हा महोत्सव आपल्या अत्यंत जवळचा आहे. ‘मिफ’ची लोकप्रियता, त्याचा उद्देश, आणि दर्जा बघता हा महोत्सव दोन वर्षांनी एकदा ठेवण्यापेक्षा वार्षिक व्हायला हवा.’

सध्याच्या डिजिटल युगात बदलत्या तंत्रज्ञानानुसार अद्ययावत राहिल्यास त्याची माहितीपट निर्मिती प्रक्रियेत नक्कीच मदत होईल असे त्यांनी सांगितले.

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात फिल्म्स डिव्हिजनची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असल्याचे सांगून घोष यांनी यावेळी ७०च्या दशकातील फिल्म्स डिव्हिजन बरोबरच्या आठवणींना उजाळा दिला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link