Next
दगडूशेठ गणपतीला माऊलींच्या अश्वांची मानवंदना
माऊलींच्या अश्वांचे पुणेकरांतर्फे पूजन
BOI
Monday, June 24, 2019 | 02:13 PM
15 0 0
Share this article:



पुणे
: माऊली माऊली... गणपती बाप्पा मोरया... जय गणेश... च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला थेट सभामंडपात जाऊन अनोखी मानवंदना दिली.

माऊलींच्या मानाच्या अश्वांनी बाप्पाला मानवंदना देण्याचे हे तिसरे वर्ष आहे. या वेळी पुणेकरांतर्फे अश्वांचे पूजन करीत विश्वकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. 

कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये रविवारी झाले. या वेळी उर्जीतसिंह शितोळे (सरकार),  महादजी राजे शितोळे (सरकार),  रामभाऊ चोपदार, दिंडी संघटनेचे अध्यक्ष मारुती कोकाटे, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, अक्षय गोडसे, मंगेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर रासने, गजानन गोडसे, स्वप्निल फुगे, सुरेश कविटके आदी उपस्थित होते. ट्रस्टतर्फे दोन्ही अश्वांना चांदीचे हार प्रदान करण्यात आले.    

महादजी राजे शितोळे सरकार म्हणाले, ’माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. तीन वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. परंतु अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना देण्याचे हे सलग तिसरे वर्ष असून, ही चांगली गोष्ट आहे. गणेशाचे दर्शन घेऊन, हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील. आषाढी वारी ही शेतकऱ्यांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात.’

महेश सूर्यवंशी म्हणाले, ‘वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. सलग तिसऱ्या वर्षी हे अश्व दगडूशेठ गणपती मंदिराच्या सभामंडपात आले. ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त वारीसोहळ्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सुरुवात चांगली झाली असून रुग्णवाहिका, आरोग्यसेवा आणि वारकऱ्यांकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search