Next
खुल्या मराठी कविता स्पर्धेत संतोष वाटपाडे प्रथम
BOI
Saturday, June 15, 2019 | 01:01 PM
15 0 0
Share this article:



पुणे :
येथील 'मदत' आणि 'आधार' फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या खुल्या मराठी कविता स्पर्धेत नाशिकच्या संतोष वाटपाडे यांना प्रथम पारितोषिक मिळाले. हा बक्षीस वितरण सोहळा नुकताच नवी पेठेतील पत्रकार भवन येथे पार पडला. 

या स्पर्धेत पुण्याच्या सुनीती लिमये यांना द्वितीय तर अक्षय बुटले यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या वेळी प्रसिद्ध भाष्य कवी रामदास फुटाणे, महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, प्रसिद्ध गीतकार समीर सामंत, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश कोठीकर आदी मान्यवर उपस्थित होते. 


कार्यक्रमाला उपस्थित गझलकार आणि कवींची या वेळी मुलाखत घेण्यात आली. तसेच उपस्थित वंचित मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही रक्कम देऊन मदत करण्यात आली. मदत फाउंडेशनतर्फे सुरू असलेल्या कार्याचे या वेळी उपस्थितांनी कौतुक केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search