Next
ओबेसिटी मंत्रा
BOI
Tuesday, December 11, 2018 | 10:05 AM
15 0 0
Share this article:

लठ्ठ व्यक्ती दिसली, की प्रत्येकाचे लक्ष तिच्याकडे जाते. अनेकदा असे लोक चेष्टेचा विषय बनतात. लठ्ठपणा अथवा ओबेसिटी ही सध्या जागतिक समस्या बनली आहे. भारतातही जाड व्यक्तींचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मुळात लठ्ठपणा हा एक आजार आहे अशी जनजागृती करून डॉ. जयश्री तोडकर आणि संतोष शेणई यांनी ‘ओबेसिटी मंत्रा’मधून लठ्ठपणा व त्यावरील उपचार सांगितले आहेत.

जाड असण्याचे वैयक्तिक, व्यावसायिक व सामाजिक पातळीवरील तोटे, या आजाराचे स्वरूप, त्याची सुरुवात कधी व कशी होते, आपली बेशिस्त जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव यामुळे लठ्ठपणाकडे होणारी प्रगती? याविषयी सांगून सतर्क केले आहे.

गलेलठ्ठ किंवा स्थूल कोणाला म्हणावे, चरबी कशी मोजावी, बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय, नैराश्य, वारसा हक्क, शरीरातील बदल, लठ्ठपणामुळे होणारे आजार, वंध्यत्व, गर्भवतींना होणारा त्रास, रजोनिवृत्तीनंतरचा त्रास, मधुमेह आदी आजार-विकारांची त्यावरील उपचार, शस्त्रक्रिया याविषयी माहिती दिली आहे. अनेकांचे अनुभव कथनही आहे.            

पुस्तक : ओबेसिटी मंत्रा
लेखक : जयश्री तोडकर, संतोष शेणाई
प्रकाशक : विश्‍वकर्मा प्रकाशन
पाने : १८८
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search