Next
‘हेअर कलर’साठी ‘गार्निएर’चा पर्याय
प्रेस रिलीज
Thursday, May 10 | 11:08 AM
15 0 0
Share this story

मुंबई : सौंदर्यासाठी परिपूर्ण वेशभूषा आणि दागिन्यांचे भरपूर पर्याय उपलब्ध असले, तरीही त्याहीपलीकडे जाऊन आणखी सुंदर दिसण्याची आता वेळ आली आहे आणि सौंदर्याच्या इतर बाबींकडेही सकारात्मकतेने पाहण्याची गरज आहे. संपूर्ण लूक सुंदर आणि सभ्य दिसण्यासाठी सुयोग्य मेक-अप आणि हेअर कलरचीही आवश्यकता असते. याबद्दल अजूनही संभ्रम असेल, तर इतर कुठेही पर्याय न शोधता गार्निएर कलर नॅचरल्स निवडा. त्यासाठी गार्निएर कलर नॅचरल्सची अॅम्बेसिडर दिशा पटानीने परफेक्ट लूकसाठी खास हेअर कलर टिप्स सांगितल्या आहेत.

अभिनेत्री दिशा पटानी म्हणाली, ‘पारंपरिक भारतीय लग्नसमारंभासाठी छान तयार होणे मी नेहमीच एन्जॉय करते. मी स्वतः मेक-अप, दागिने आणि हेअर कलरकडे अशा समारंभांच्यावेळी खूप लक्ष देते. फक्त मोठ्या समारंभांची यादीच नाही, तर हल्ली लग्नाच्या थीम्सचीही फार चलती आहे. भव्य पारंपरिक वारसापूर्ण लग्नांपासून समुद्रकिनार्‍यांवरील खास सोहळ्यांपर्यंत आपल्याकडे बरेच पर्याय असतात. यातून प्रत्येक वेळी वैविध्यपूर्णतेने नटण्याची आणि आपल्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी आपल्याला मिळते. वेगळा लुक हा मुद्दा आला की मी मेकअप, अॅक्सेसरी आणि हेअर कलरकडे अधिक लक्ष देते. डॅशिंग हेअर कलरमुळे आपल्या आधुनिक रूपाला आणखी वेगळा आयाम प्राप्त होतो आणि आपण अधिक फॅशनेबल दिसू शकतो. न्यू गार्नियर कलर नॅचरल्सच्या ब्राऊन आणि वाईन बर्गंडी या माझ्या आवडत्या रंगछटा असून या छटा पारंपरिक भारतीय वेशभूषेसह पाश्चिमात्य गाऊन्ससोबतही खुलून दिसतात.’

‘ब्राऊन आणि बर्गंडीसारखे हेअर कलर्स पारंपरिक, ठळक रंगांच्या भारतीय वेशभूषेसह हलक्या रंगांच्या पश्चिमात्य गाऊन्सनाही शोभून दिसतात. तुमच्या त्वचेच्या पोताला साजेशी सुयोग्य रंगछटा निवडण्यावर सारा लूक अवलंबून असतो. म्हणूनच, यंदाच्या लग्नसमारंभाच्या काळात, तुमच्या पारंपरिक वेशभूषेला आणि परफेक्ट लूकसाठी जो रंग सूट होईल तो योग्य प्रकारे निवडा. कारण, यामुळे केवळ तुमचा लूक बदलत नाही, तर त्यातून तुमचे स्टाईल स्टेटमेंटच विकसित होत असते. योग्य रंगछटा निवडा आणि कलरफूल वेडिंग सिझनचा आनंद घ्या,’ असे आवाहनही दिशाने केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link