Next
डॉ. कल्याणी हर्डीकर यांचे व्याख्यान
रसिक मित्र मंडळातर्फे मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर कार्यक्रम
प्रेस रिलीज
Thursday, November 22 | 01:54 PM
15 0 0
Share this story

मंगेश पाडगावकरपुणे : ‘रसिक मित्र मंडळातर्फे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर डॉ. कल्याणी हर्डीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘एक कवी-एक भाषा’ या व्याख्यानमालेअंतर्गत हे व्याख्यान २३ नोव्हेंबर २०१८ रोजी शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे होणार आहे,’ अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी दिली.

पाडगावकर यांच्या जीवनावरील काही दुर्मिळ ध्वनी, चित्रफिती, तसेच अरुण दाते यांनी गायलेली पाडगावकर यांची भावगीते या वेळी दाखविण्यात येणार आहेत. ‘एक कवी-एक भाषा’ व्याख्यानमालेअंतर्गत हे  ५९ वे व्याख्यान   आहे.

व्याख्यानाविषयी :
दिवस :
शुक्रवार, २३ नोव्हेंबर २०१८
वेळ : सायंकाळी साडेपाच वाजता
स्थळ : पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह, नवी पेठ, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link