Next
बॉक्स ऑफिसवर ‘उरी’ची धूम
सर्जिकल स्ट्राईक हुबेहूब मांडणाऱ्या चित्रपटाने चार दिवसांत केली ४५ कोटींची कमाई
BOI
Thursday, January 17, 2019 | 12:57 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ११ जानेवारीला प्रदर्शित झालेला २०१९मधील पहिलाच कंटेंट बेस्ड आणि सत्यघटनेवर आधारित ‘उरी – दी सर्जिकल स्ट्राइक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. अभिनेता विकी कौशल आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या चार-पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर जवळपास ४६ कोटींची कमाई केली आहे.

याबाबत ‘बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉम’ या वेबसाइटने जाहीर केलेल्या माहितीनुसार ‘उरी’ चित्रपटाने प्रदर्शनानंतर पहिल्याच शनिवारी १२.१५ कोटी आणि रविवारी १५ कोटींची कमाई केली. त्यानंतर पुढील दोन दिवसांत चित्रपटाने जवळपास १० कोटींची कमाई केली आहे. पुढील किमान आठवडाभर तरी या चित्रपटाची ही घौडदौड अशीच सुरू राहील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. हा चित्रपट केवळ २५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. त्यामुळे पहिल्या तीन दिवसांतच चित्रपटाने गुंतवलेली रक्कम वसूल केली आहे असे म्हणता येईल. 

यामी गौतम१८ सप्टेंबर २०१६ला जम्मू काश्मीरमधील ‘उरी’ येथील मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले होते. भारतीय लष्कराने या घटनेचा बदला घेण्याचे निश्चित केले. या संपूर्ण घटनेवर आधारितच ‘उरी’ हा सिनेमा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी ‘सर्जिकल स्ट्राइक’ या घटनेचा पुरेसा अभ्यास करत हा चित्रपट देशाच्या समोर आणला आहे. यासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. भारतीय लष्कराच्या इतिहासातील हा पहिलाच सर्जिकल स्ट्राइक होता असे म्हटले जाते. 

विकी कौशलमेजर शेरगिल यांच्या भूमिकेत असलेल्या विकी कौशलने चित्रपटात शेरगिल यांची भूमिका खऱ्या अर्थाने जगली आहे. मेजर विहान (विकी) हा मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या तुकडीचा प्रमुख असतो. एक सैनिक, त्याच्या भावना, देशप्रेम, दहशतवादाविरोधातली चीड या सगळ्या भावना विकी कौशलने अगदी कौशल्याने मांडल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना तो आणखी जवळचा वाटला. चित्रपटातील अभिनेत्री यामी गौतमही चित्रपटाबाबत उत्सुक होती. आपल्या करिअरमधील हा एक महत्त्वाचा चित्रपट असल्याचे यामीने म्हटले आहे. चित्रपटात विकी, यामीसह परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

‘उरी’ या ठिकाणचा हल्ला नेमका कसा झाला, भारतीय जवानांनी शत्रूला नेमके कसे नेस्तनाबूत केले, याचे हुबेहूब चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे. याशिवाय लष्कराच्या कारवाया, वॉर रूम, प्रत्यक्ष निर्णय प्रक्रिया या सगळ्या घटनांचे एखाद्या चित्रपटात प्रत्यक्ष चित्रण केल्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search