Next
‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’
BOI
Thursday, October 04, 2018 | 01:40 PM
15 1 0
Share this article:

रत्नागिरी : ‘अनुलोम ही संस्था सर्वसामान्य लोकांसाठी तळमळीने काम करणारी सामाजिक संस्था असून, या संस्थेच्या पुढाकारामुळे सर्वसामान्य लाभार्थींना सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. या संस्थेने अटल सन्मान कामगार अभियानात आम्हाला चांगले सहकार्य केले,’ असे प्रतिपादन सहाय्यक कामगार आयुक्त विश्वास जाधव यांनी केले.

कामगार कल्याण योजनेच्या अटल सन्मान कामगार अभियानांतर्गत भरलेल्या कार्डचे वाटप शहरापासून जवळच असलेल्या मिरजोळे गावात तीन ऑक्टोबरला करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी अनुलोमचे सीईओ अतुल वझे यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली. जिल्हा कामगार अधिकारी संदेश आयरे यांनी कामगार कल्याण कार्डाचे महत्त्व आणि त्याचे फायदे यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.  

या प्रसंगी अनुलोम कोकण विभागप्रमुख सदाशिव चव्हाण, उपविभाग जनसेवक स्वप्नील सावंत, वस्तीमित्र साक्षी कळंबटे, सरपंच गजानन गुरव, भाग जनसेवक रवींद्र भोवड, ग्रामसेवक श्री. सावंतदेसाई व ग्रामपंचायत सदस्य यांसह १३५ कामगार उपस्थित होते.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search