Next
‘एसओटीसी’कडून पर्यटनासाठी विशेष मान्सून पॅकेजेस
प्रेस रिलीज
Thursday, June 21, 2018 | 12:25 PM
15 0 0
Share this story

मुंबई : एसओटीसी ट्रॅव्हलने पावसाळी पर्यटनाच्या मोसमात ग्राहकांसाठी किफायतशीर ठरतील, अशी आपली वार्षिक मान्सून ट्रॅव्हल पॅकेजेस आणली आहेत. नित्याचा ऑफ-सीझन असतानाही एसओटीसी ट्रॅव्हलकडे चौकशींचा भडीमार होताना पाहायला मिळत आहे; तसेच मान्सून २०१८साठीच्या पर्यटनाला देखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

पैशांचा संपूर्ण मोबदला देण्याबरोबरच एक रोमहर्षक अनुभव देणारी ही भारत आणि विदेशातील पर्यटनाची ही पॅकेजेस म्हणजे पर्यटकांच्या दृष्टीने एक आगळी-वेगळी पर्वणीच आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मस् (मोबाइल आणि वेबसाइट), कॉल सेंटर्स आणि विस्तारलेली आऊटलेट्स अशा ‘एसओटीसी’च्या ओम्नी-चॅनल नेटवर्कद्वारे ही पॅकेजेस उपलब्ध होतील.

या सीझन ऑफरबद्दल ‘एसओटीसी’चे प्रॉडक्ट, कॉन्ट्रॅक्टिंग अॅंड इनोव्हेशनचे प्रमुख अमोद थत्ते म्हणाले, ‘दैनंदिन कामकाजातून थोडासा आराम मिळावा आणि त्यातून नवा उत्साह यावा, यासाठी ही मान्सून पॅकेजेस आहेत. आमच्या ग्राहकांना पैशांचा पुरेपूर मोबदला मिळावा, यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो. त्यातूनच वेगवेगळ्या पर्यटनस्थळांसाठी अविश्वसनीय अशी पॅकेजेस एसओटीसी ट्रॅव्हलने तयार केली आहेत. आपल्या कुटुंबियांसह अशा पर्यटनांचा लाभ घेणाऱ्या भारतातील लोकांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे.’

‘खर्चाच्याबाबतीत दक्ष असलेल्या ग्राहकांच्या दृष्टीने आम्ही योग्य मोबदल्यात मिळू शकेल, अशा पर्यटनाची विशेष आखणी केली आहे. विमान प्रवासाचा आनंद देणारी ३८ हजार रुपयांपासूनची विदेशयात्रा आणि ३१ हजार ९०० रुपयांच्या देशातील पर्यटनाशी संबंधित या पॅकेजेसना वाढती पसंती मिळत आहे,’ असे थत्ते यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link