Next
संदेश महाजनने जिंकली कोलगेट शिष्यवृत्ती
प्रेस रिलीज
Thursday, September 20 | 10:48 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ओरल केअर उत्पादनांच्या बाजारपेठेत अग्रस्थानी असलेल्या कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे दिली जाणारी कोलगेट शिष्यवृत्ती धुळे येथील संदेश महाजन या १२ वर्षांच्या मुलाने जिंकली आहे.

संदेशची आई गृहिणी असून त्यांना स्वत:ला कधी शाळेत शिकता आले नाही. संदेशसाठी मात्र त्यांनी नेहमीच मोठी स्वप्ने पाहत आल्या आहेत. लहानपणापासून संदेशला मशिन्स तयार करण्याचा छंद असून, त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनीअर बनण्याची क्षमता असल्याची बाब त्यांनी हेरली. ‘आमच्यासाठी कोलगेटची ही शिष्यवृत्ती म्हणजे फक्त पैसा नाही, तर संदेशला त्याची स्वप्ने साकार करण्याच्या दिशेने पुढे पाऊल टाकण्यासाठी मिळालेले हे मोठे प्रोत्साहन आहे. ही संधी दिल्याबद्दल मी कोलगेटचे आभार मानते,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या कार्यक्रमाबद्दल बोलताना कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडचे मॅनेजिंग-डायरेक्टर इस्साम बचलानी म्हणाले, ‘ज्याच्याकडे पाहून चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटावे असा भविष्यकाळ मिळविण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, असे कोलगेटला वाटते आणि आमच्या वार्षिक शिष्यवृत्ती कार्यक्रमातून आम्ही हाच विश्वास प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करत आहोत. हा कार्यक्रम वर्षागणिक लक्षणीयरित्या विस्तारत आहे. यावर्षी आम्ही शिष्यवृत्तींची संख्या वाढवली आहेच, पण त्याचबरोबर प्रत्येक कोलगेट शिष्यवृत्ती संचाबरोबर विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षणाचीही संधी मिळावी यादृष्टीने BYJU’s या लर्निंग अॅपबरोबरची आमची भागीदारीही चालू ठेवली आहे. कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा अधिकाधिक भारतीय कुटुंबांनी, मुलांनी लाभ घ्यावा आणि त्यांना अधिक चांगले व उज्ज्वल भवितव्य घडविता यावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link