Next
संजीवनी मराठे, वासुदेव सोनार
BOI
Wednesday, February 14, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘आभाळाची होईन म्हणता, क्षणात झरझर येते खाली – कुशीत भुईच्या मिटेन म्हणता, जीव कळीतून उमलू पाही’ असं म्हणणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठे आणि अनुष्टुभ मासिकाचे विश्वस्त आणि कथाकार वासुदेव सोनार यांचा १४ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
.......
संजीवनी मराठे
१४ फेब्रुवारी १९१६ रोजी पुण्यामध्ये जन्मलेल्या संजीवनी रामचंद्र मराठे या कवयित्री, गीतकार आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची मुलगी अंजू ह्यूब व्हॉर्न वेर्श नावाच्या डच तरुणाशी लग्न करून कायमची हॉलंडमध्ये राहायला गेली. त्यानंतर तिच्या वेळोवेळच्या सुंदर पत्रव्यवहारावरून त्यांनी ‘ट्युलिप्सच्या देशातून’ हे काढलेलं पुस्तक गाजलं होतं. वाचकांना मायलेकीच्या नात्याबरोबरच तिथल्या राहणीमानाचं, जीवनपद्धतींच सुंदर दर्शन त्यातून घडतं. ‘कन्फ्रट ए प्रॉब्लेम अँड यू विल गेट ए सोल्युशन, रन अवे फ्रॉम इट अँड यू विल नेव्हर बी फ्रॉम इट!’ हे फार छान प्रकारे तिने त्यातून सांगितलं आहे. 

अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे, आला स्वप्नांचा मधुमास, आळविते मी तुला विठ्ठला, जिवाचा जिवलगा नंदलाला, या गडे हासू या, शांत सागरी कशास उठविलीस वादळे, सकल मिळुनि हसुनि, सत्यात नाहि आले, सोनियाचा पाळणा रेशमाचा अशी त्यांची काही गीतं प्रसिद्ध आहेत.

मासुमा आणि इतर प्राणिकथा, माझा भारत, मी दिवाणी, भावपुष्प, बरं का गं आई, गंमत, चंद्रफूल, चित्रा, छाया – अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

एक एप्रिल २००० रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला.
...............

वासुदेव रामदास सोनार

१४ फेब्रुवारी १९३३ रोजी जन्मलेले वासुदेव रामदास सोनार हे कवी आणि कथाकार म्हणून ओळखले जातात. ‘अनुष्टुभ’ या प्रसिद्ध मासिकाचे ते विश्वस्त होते आणि त्यांनी सहसंपादक म्हणून काम पाहिलं आहे. अनाद, नितांत, इथलेच जळ इथलीच माती, अंगावर अंधार. जनुकाका, दारे देवाची, दुबळी माणसे, बुडत्याचा पाय खोलात, ये रे धना – असं त्यांचं साहित्य प्रसिद्ध आहे. 

१५ सप्टेंबर २००४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link