Next
‘बँक ऑफ महाराष्ट्र’तर्फे आता नवीन ईएमव्ही चीप कार्ड
प्रेस रिलीज
Thursday, March 22, 2018 | 11:17 AM
15 0 0
Share this story

पुणे :  सुरक्षित आणि निर्धोक एटीएम याचबरोबर ऑनलाइन होणाऱ्या व्यवहारांची विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आता, पूर्वी वितरित केलेल्या जुन्या मॅगस्ट्रिप कार्डाऐवजी नव्या आणि सुरक्षित ईएमव्ही प्रणालीचे कार्ड आपल्या सर्व ग्राहकांना बदलून देणार आहे.  नवीन कार्ड  आपल्या सर्व ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी बँकेने विविध उपाययोजना केल्या असून,  ग्राहकांना  जुने कार्ड देऊन नवीन  ईएमव्ही प्रणालीचे कार्ड बदलून घेण्याची विनंती केली आहे.
 
बँकेच्या कोणत्याही शाखेमधून बँकेचे ग्राहक सुधारीत ईएमव्ही कार्ड घेऊ शकतात. यासाठी बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये जाऊन एक अर्ज भरल्यास ग्राहकांना नवीन सुधारित ईएमव्ही कार्ड दिले जाईल. ग्राहकांनी नवे कार्ड स्वीकारल्यानंतर ताबडतोब चोवीस तासाच्या आत नव्याने दिलेले ईएमव्ही चिपसह असलेले डेबिट (एटीएम) कार्ड सक्रिय केले जाईल.

ग्राहक ही नेहमीच बँक ऑफ महाराष्ट्रची प्राथमिकता असल्याने कार्ड बदलून देण्याच्या कार्यास प्राधान्य देण्यासंबंधी बँकेच्या सर्व शाखांना निर्देश दिले गेले आहेत. हे कार्य जलदगतीने पूर्ण करण्यासाठी  सर्व कर्मचाऱ्यांना  मार्गदर्शन देण्यात आले  असून, फॉर्म भरल्यानंतर वीस मिनिटांमध्ये जुने कार्ड खात्रीपूर्वक बदलून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
 
सर्व क्षेत्रीय आणि नोडल शाखांकडे असलेल्या उपलब्ध कार्डाची संख्या तपासून बँक वेळोवेळी अतिरिक्त कार्ड पुरविते. ग्राहकांना जुने कार्ड बदलून देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी बँकेने किमान वेळेत कार्ड्स सक्रिय करण्याचा प्रयत्न केला असून बँकेची सर्व क्षेत्रीय कार्यालये / नोडल शाखांमध्ये पुरेशी कार्डे  उपलब्ध करून दिलेली आहेत.
 
बँक ऑफ महाराष्ट्र जुन्या चुंबकीय पट्टीच्या कार्डाऐवजी आता अधिक सुरक्षित कार्ड बदलून देण्याचे कार्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दिशांनिर्देशांप्रमाणे करत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनी घालून दिलेल्या मुदतीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याची  बँकेची योजना आहे, असे बँकेने कळवले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ravindra kisan Bhangare About 86 Days ago
Good
0
0

Select Language
Share Link