Next
सुपा पारनेर येथे मायडिया टेक्नोलॉजी पार्कची कोनशिला
प्रेस रिलीज
Monday, November 05, 2018 | 02:45 PM
15 0 0
Share this storyपुणे : मायडिया ग्रुप या जागतिक ग्राहकोपयोगी उपकरण उत्पादक, तसेच फॉर्चुन ५०० कंपनीने पुण्याजवळील सुपा पारनेर येथे टेक्नोलॉजी पार्कची कोनशिला ठेवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मायडिया ग्रुपचे संस्थापक शिंगजियान, आणि मायडिया ग्रुपचे अध्यक्ष पॉल फंग यांच्या हस्ते कोनशिला रचण्यात आली.

या वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम करतो. अनुकूल परिसंस्था निर्माण करण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम हाती घेतल्यामुळे आता महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे ठिकाण झाले आहे. आमच्या राज्यात टेक्नोलॉजी पार्क स्थापन करण्यासाठी गुंतवणुकीचा निर्णय मायडिया ग्रुपने घेतला याचा मला आनंद आहे. महाराष्ट्र हे उत्पादन, निर्मिती आणि संशोधनाचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रवासात याची आम्हाला मदत होईल.’टेक्नोलॉजी पार्कचे संकुल पुण्याजवळील सुपा पारनेर येथील एमआयडीसी इंडस्ट्रियल पार्क क्रमांक दोन भागात २०१८ मध्ये संपादित करण्यात आलेल्या ६८ एकर परिसरात उभारले जात आहे. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी सुसंगती राखत, येत्या पाच वर्षांत अंदाजे एक हजार ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून टेक्नोलॉजी पार्क स्थापन करण्याचे ‘मायडिया’चे नियोजन आहे. या टेक्नोलॉजी पार्कमध्ये गृहोपयोगी उपकरणे, एअर कंडिशनर्स आणि कॉम्प्रेसर्सचे उत्पादन केले जाईल. गृहोपयोगी उपकरणे, एचव्हीएसी उपकरणे आणि कॉम्प्रेसर्सच्या उत्पादनासाठी या टेक्नोलॉजी पार्कमध्ये कारखाने उभारले जातील. यामध्ये कॅरिअर मायडिया इंडिया या मायडिया आणि यूटीसी क्लायमेट कंट्रोल अॅंड सिक्युरिटी (यूटीसी सीसी अॅंड सी) यांच्या ६०:४० संयुक्त उपक्रमाचा उत्पादन कारखानाही असेल.

एचव्हीएसी उत्पादनांसाठीचे कॉम्प्रेसर तयार करणारा जगातील सर्वात मोठा उत्पादक, तसेच मायडिया ग्रुपमधील एक कंपनी जीएमसीसीचा कारखानाही टेक्नोलॉजी पार्कमध्ये असेल. या आधुनिक कारखान्यामध्ये ग्रुप गुंतवणूक करत आहे. त्याचप्रमाणे मायडियाच्या कारखान्यांना पूरक भाग पुरवणाऱ्या कंपन्यांकडूनही टेक्नोलॉजी पार्कमध्ये गुंतवणूक केली जाण्याची शक्यता आहे.

टेक्नोलॉजी पार्कमधून दोन हजारांहून अधिक लोकांसाठी रोजगाराच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संधी निर्माण होणे अपेक्षित आहे. २०२० सालाच्या सुरुवातीला या संकुलातून व्यावसायिकरित्या काम सुरू होण्याची शक्यता आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link