Next
‘पुलं’च्या व्यक्तिरेखा भेटणार ‘पुलकित रेषां’मधून...
BOI
Thursday, December 06, 2018 | 04:34 PM
15 0 0
Share this story


रत्नागिरी : आर्ट सर्कल आणि ‘आशय सांस्कृतिक’तर्फे रत्नागिरीत होणार असलेल्या ‘पुलोत्सवा’मध्ये ‘पुलकित रेषा’ हे व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा विविध चित्रकारांच्या कुंचल्याच्या माध्यमातून त्या वेळी रसिकांना अनुभवता येणार आहेत. ‘चिंटू’ या लोकप्रिय पात्राची निर्मिती करणारे ज्येष्ठ चित्रकार चारुहास पंडित यांच्या हस्ते सात डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. नऊ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले असणार आहे. 

या प्रदर्शनात विविध चित्रकारांनी काढलेली ७५ व्यंगचित्रे पाहता येणार आहेत. कलांमधील सौंदर्य शोधणारे आणि ते उलगडून दाखवणारे आनंदयात्री म्हणजे ‘पुलं’. म्हणूनच या ‘पुलोत्सवा’त विविध कलांचा जागर होणार आहे. आठ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावरकर नाट्यगृहात चारुहास पंडित यांची मुलाखत होणार असून, मुलाखतीतून पंडित व्यंगचित्राचे माध्यम उलगडून दाखवणार आहेत. चिंटू हा चारुहास पंडित यांचा मानसपुत्र! वृत्तपत्रातून भेटीला येणारी चिंटू, मिनी, राजू, बगळ्या ही पात्रे सलग २१ वर्ष आबालवृद्धांच्या मनात स्थान मिळवून आहेत. चित्रपट, अॅनिमेशन या माध्यमांतूनही चिंटू रसिकांच्या भेटीला आला. 

चारुहास पंडितया वेळी व्यंगचित्र कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा मोफत असून, चित्रकलेच्या विश्वातील एक नवीन दार या कार्यशाळेच्या निमित्ताने मुलांना आणि मोठ्यांनाही खुले होणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही. यात जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आर्ट सर्कल’तर्फे करण्यात आले आहे.

‘पुलोत्सवा’च्या १०० रुपये देणगीमूल्याच्या प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी नाट्यगृहावर उपलब्ध असतील. या प्रवेशिकांच्या विक्रीतून येणारी सर्व रक्कम या वर्षी ‘पुलंसुनीत’ या उपक्रमांतर्गत जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम गेल्या दहा वर्षांतील सामाजिक कृतज्ञता सन्मानप्राप्त संस्थांना समान विभागून देण्यात येणार आहे, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले असून, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anand G Mayekar About 75 Days ago
Apratim sohala. P.L.chya athavanina jivant tumhi kele ya baddhal manahpurvak dhanyawad ani khup khup shubhechha.
0
0

Select Language
Share Link