Next
सह्याद्री हॉस्पिटलमध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण
प्रेस रिलीज
Friday, July 20, 2018 | 12:00 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ​लिव्हर सिरॉसिसने ग्रस्त असलेल्या ५४ वर्षीय रुग्णावर डेक्कन, जिमखाना येथील ​​सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ​यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. हे यकृत कोल्हापूरच्या अॅस्टर आधार रुग्णालयात मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित केलेल्या एका ​२४​ वर्षीय तरुणाने दिले.

या तरुणाच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने त्याला कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अवयवदात्याबाबत माहिती मिळाल्यावर सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाने हे यकृत काढून ते पुण्यात आणले. त्यासाठी कोल्हापूर ते पुणे या दरम्यान ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात आला आणि पुण्यात पोहोचल्यावर ‘सह्याद्री’ येथील यकृत ​प्रत्यारोपण ​व हेपॅटॉबिलिअरी सर्जन डॉ. बिपीन विभूते यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण केली.

याबाबत बोलताना यकृत ​प्रत्यारोपण​ व हेपॅटॉबिलिअरी सर्जन डॉ. दिनेश झिरपे म्हणाले, ‘कोल्हापूर येथील दात्याची माहिती आम्हाला मिळताच आमचे पथक अॅस्टर आधार रुग्णालयात पोहोचले व त्यांनी हे यकृत काढून पुण्यात आणले. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने कोल्हापूर ते पुणे दरम्यान ग्रीन कॉरिडॉर निर्माण करून पुण्याला तीन तासातच हे यकृत आणण्यात आले. सर्वसामान्यपणे कोल्हापूर ते पुणे प्रवासासाठी चार ते पाच तास लागतात. त्यानंतर भोसरीतील ५४ वर्षीय रुग्णावर या यकृताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. या रुग्णाच्या दोन्ही मूत्रपिंडांवर सूज आली होती व तातडीने यकृत प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. अवयवदात्या युवकाच्या नातेवाईकांचा निर्णय, तसेच दोन्ही रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या रुग्णाला नवे जीवन मिळण्यास मदत झाली.’

प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ डॉ. मनीष पाठक म्हणाले, ‘अवयवदात्या युवकाच्या नातेवाईकांना आम्ही विशेष धन्यवाद देतो; तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते व ग्रीन कॉरिडॉरसाठी वाहतूक पोलिसांनी नेहमीसारखेच मोलाचे सहकार्य केले.’

यकृत ​प्रत्यारोपण व हेपॅटॉबिलिअरी सर्जन डॉ. बिपीन विभूते, डॉ. दिनेश झिरपे​, डॉ. अनिरुद्ध भोसले, भूलतज्ज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. मनोज राऊत, क्लिनीशिअन डॉ. अभिजीत माने, प्रत्यारोपण समन्वयक राहुल तांबे व अरुण अशोकाने, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला पाध्ये यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सचे युनिट प्रमुख डॉ. केतन आपटे म्हणाले की, ‘अवयवाच्या प्रत्यारोपणाबाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी आनंददायी बाब आहे; परंतु अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयदाते यांच्या संख्येत अजुनही प्रचंड तफावत आहे. म्हणूनच जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प करणे आवश्यक आहे. अवयवदात्या युवकाच्या नातेवाईकांनी यकृत दान करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल  आम्ही त्यांचे आभार मानतो; तसेच, मेडिकल सोशल वर्कर, वाहतूक पोलिस, आमच्या डॉक्टरांच्या टीममधील भूलतज्ज्ञ व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले आमचे सर्व पथक यांच्या बहुमोल पाठिंब्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search