Next
भीमथडी जत्रेत यंदा फॅशन शो व सांगीतिक कार्यक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, December 19 | 12:21 PM
15 0 0
Share this story

सुनंदाताई पवार व सई पवारपुणे : महाराष्ट्राच्या संस्कृतीत जत्रा म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदान-प्रदानाचा एक सणच असतो. ‘भीमथडी जत्रा’देखील याचेच एक उदाहरण आहे. ग्रामीण संस्कृतीचा शहरांशी साधलेला एक संवाद सोहळा म्हणून भीमथडी जत्रा नावारूपास आली. गेली १२ वर्ष ‘अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती’ ही संस्था पुण्यात भीमथडी जत्रा भरवते.  यावर्षी ही जत्रा २२ ते २५ डिसेंबर या काळात अॅग्रीकल्चर कॉलेज ग्राऊंड, सिंचननगर, पुणे येथे होणार आहे. 

अॅग्रीकल्चरल डेव्हपलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या उपस्थितीत आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पोलिस उपमुख्य अधिकारी ज्योती प्रिया सिंग, येरवडा जेलच्या प्रभारी स्वाती साठे, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, सुमाताई किर्लोस्कर, वेदांती राजे भोसले व वर्षा चोरडिया यांच्या हस्ते २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भीमथडीचे उद्घाटन होईल. 

महिला बचत गटांचे दर्जेदार उत्पादन, हस्तकला वस्तू , महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन या सर्व गोष्टींचा या जत्रेत एकाच छताखाली आनंद घेता येतो. म्हणून भीमथडी जत्रेला गेल्या अकरा वर्षात पुणेकरांनी प्रचंड प्रेम दिलं. ग्रामीण महिलांच्या मेहनतीला आणि ग्रामीण कलाकारांच्या कलागुणांना दाद दिली. यातून महिला बचत गटांची आर्थिक उन्नती झाली. अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या झाल्या. 

अॅग्रीकल्चरल डेव्हपलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण कृतीशील मार्गदर्शनातून, मेहनतीतून भीमथडी जत्रा  हा अभिनव उपक्रम नावरूपाला आला. यंदा भीमथडी जत्रा आपल्या १२ व्या वर्षात पदार्पण करते आहे. या वर्षीच्या भीमथडी जत्रेला पुणेकर भरघोस प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांना आहे.
यावर्षी तीनशेपेक्षा अधिक ग्रामीण संस्कृतीचे स्टॉल भीमथ़डी मध्ये पहावयास मिळतील. भीमथडी जत्रा दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन प्रदर्शन भरवते. यंदाच्या जत्रेचं खास आकर्षण असणार आहे, ते म्हणजे रात्रीचा ‘भीमथडी सिलेक्ट फॅशन शो’ आणि लहान मुलांसाठी खास ख्रिसमस ‘विशेष पेटिंग झू’.
पल्लवी दत्ता यांच्या संकल्पनेतून साकारलेली भीमथडी सिलेक्ट थिम यावर्षी पहावयास मिळेल; ज्यात  फॅशनच्या अनोख्या वीस स्टॉल्सचा एक विशेष विभाग आहे. यात भारतातील पारंपरिक हातमाग, हस्तकला आणि इतर हस्तशिल्प पहायला मिळेल. सांगीतिक कार्यक्रमांचादेखील भीमथडीत समावेश आहे. २३ डिसेंबर रोजी रात्री सात वाजता रघु दीक्षित आणि २२ डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजता ‘रेझोनन्स’चे वैभव जोशी आणि अंजली मराठे आपली कला प्रस्तुत करतील. 

टेक्नोसॅव्ही आणि रिचेबल भीमथडी जत्रा :
या इंटरनेटच्या युगात भीमथडी जत्राही टेक्नोसॅव्ही  झाली आहे. तुम्ही या जत्रेतील विविध उपक्रम, कॉन्सर्टस् आता इंटरनेटवरून बुक करू शकता. www.bookmyshow.com  या संकेतस्थळावरून आपले तिकीट कन्फर्म करू शकता. पुण्यातील कोणत्याही भागातून भीमथडी जत्रेला येण्यासाठी 'UBER' टॅक्सी बुक केल्यास प्रवासभाड्यात ३० टक्के सवलत देण्यात आली आहे.  यासाठी तुम्ही 'JATRA17' हा कोड 'UBER' बुक करताना वापरा. 

कार्यक्रमाविषयी :
भीमथडी जत्रा २०१७
दिनांक : २२ ते २५ डिसेंबर २०१७
ठिकाण : अॅग्रीकल्चर कॉलेज ग्राऊंड, सिंचननगर, पुणे

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link