Next
रेल्वे तिकीट आरक्षणासाठी ‘कन्फर्मतिकिट’ मदतीला
‘कन्फर्म तिकिट’द्वारे सर्वात व्यग्र रेल्वेमार्गाची यादी जाहीर
प्रेस रिलीज
Monday, August 20 | 05:51 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील बहुप्रतीक्षित सणांचा कालावधी आता जवळ आला असून, रेल्वेची तिकिटे मिळण्याची शक्यता दुरापास्त होत चालली आहे. प्रवाशांना तिकीट आरक्षण करण्यापूर्वी कोणते रेल्वेमार्ग अधिक व्यस्त आहेत, याची माहिती ‘कन्फर्मतिकिट’ या ऑनलाइन तिकीट शोध आणि बुकिंग इंजिनने दिली आहे; तसेच प्रवाशांना थेट मार्गासाठी तिकीट न मिळाल्यास अन्य पर्यायही सुचवले आहेत. 

‘कन्फर्मतिकिट’चा प्रगतीशील डेटा आणि एआयवर चालणाऱ्या यंत्रणेद्वारे थेट गाड्या उपलब्ध नसल्यास पर्यायी रेल्वेमार्ग दिसू शकतात. निश्चित तिकीटे मिळण्याची शक्यता सर्वाधिक असलेली ठिकाणे आणि ९४ टक्के अचूकतेने प्रतीक्षा यादीतील तिकिटे निश्चित होण्याची शक्यताही कळू शकेल.

‘कन्फर्मतिकिट’कडून अद्ययावत ग्राफवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि प्रवाशांना अगदी शेवटच्या क्षणी बुकिंग करण्याच्या वेळीही तिकीट मिळण्याची जास्त शक्यता देण्यासाठी प्रवासासाठी उपलब्ध असलेले सर्व प्रकारचे कोटा वापरले जातात.

ऑगस्ट आणि डिसेंबरदरम्यानच्या कालावधीसाठी, बंगळुरू- कोलकाता, चेन्नई- भुवनेश्वर, मुंबई- मंगळुरू, मुंबई- कोटा, दिल्ली- मुंबई, हैदराबाद- विशाखापट्टणम आणि मुंबई- बंगळुरू हे सर्वाधिक तिकीट नोंदणी झालेले मार्ग आहेत. बंगळुरू- कोलकत्यासाठी ‘कन्फर्मतिकिट’ विशाखापट्टणम आणि जोलारपेट्टाई या पर्यायी मार्गावरून प्रवास करण्याचे सुचवते, तर  चेन्नई-भुवनेश्वरसाठी पर्यायी रेल्वेमार्गांमध्ये विजयवाडा आणि विशाखापट्टणम या स्थानकांचा समावेश होईल. मुंबई- मंगलोरसाठी पर्यायी मार्गामध्ये रत्नागिरी, कारवार आणि गोवा ही स्थानके असू शकतील. याशिवाय, ‘कन्फर्मतिकिट’कडून प्रवासाचे नियोजन मंगळवार किंवा बुधवारी प्रवासाच्या तारखा येतील अशा रितीने करण्यास सुचवले जाते, जेणेकरून कन्फर्म तिकिटे मिळण्याची शक्यता जास्त असेल. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link