Next
गुंदवलीच्या सरपंचपदी संध्या पाटील बिनविरोध
BOI
Friday, November 23, 2018 | 04:16 PM
15 0 0
Share this article:भिवंडी : तालुक्यातील गुंदवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या संध्या जयराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

गुंदवली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सोनाली म्हात्रे यांनी ठरल्याप्रमाणे सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त असलेल्या सरपंचपदासाठी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्या आदेशाने ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर. बी. भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली असता संध्या पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी भोसले यांनी सरपंच म्हणून पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

सरपंचपदी निवड होताच पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला. या वेळी ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समिती सभापती सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, पंचायत समिती सदस्य विकास भोईर, माजी उपसभापती महादेव घरत, उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील, वळ शाखाप्रमुख अनंता भामरे, उपसरपंच विलास पाटील, उपसरपंच विष्णू पाटील, उपतालुका प्रमुख सत्यवान पाटील, समाजसेवक शांताराम म्हात्रे, उपसरपंच उत्तम म्हात्रे, सरपंच विजय म्हात्रे, सरपंच मनेष म्हात्रे, सरपंच संजय पाटील, सदस्या सुरेखा पाटील, निता म्हात्रे, आनंदीबाई भोईर आदींनी नवनिर्वाचित सरपंच पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

‘माझी सरपंचपदी बिनविरोध निवड करून संपूर्ण गावाने माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे. त्याला कुठेही तडा न जाता आमचे नेते व जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांना सोबत घेऊन ग्रामविकासाच्या योजना पारदर्शकतेने राबवण्याचा प्रयत्न करेन’ अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच पाटील यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search