Next
असामान्य धैर्य दाखवणाऱ्या शूरांचा तावडे यांच्या हस्ते गौरव
BOI
Monday, December 31, 2018 | 03:26 PM
15 0 0
Share this story

सौरभ लंके, सुधाकर शेट्टी, अविनाश भाटे आदी धाडसी वीरांचा मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी सत्कार केला. या वेळी राज पुरोहित, मुख्य सचिव डी. के. जैन, सचिव सौरभ विजय,  नगरसेवक   सावंत आदी उपस्थित होते.

मुंबई : प्रसंगावधान राखून स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची, काळजी न करता समोर अडकलेला माणूस आपला कुटुंबीय आहे, असे मानून त्यांच्या संरक्षणासाठी धावून गेलेल्या धैर्यवानांचे मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी कौतुक केले.

चेंबूरच्या टिळकनगर परिसरात सरगम सोसायटीला लागलेल्या भीषण आगीत गुरुवारी पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव वाचविणाऱ्या सौरभ लंके, सुधाकर शेट्टी, अविनाश भाटे यांच्यासह बचाव कार्यात अग्रेसर असलेल्या इतर सहकाऱ्यांचे नुकतेच मंत्रालयात कौतुक करण्यात आले.

 

या तिघांनी दाखविलेल्या धैर्यामुळे तब्बल २५ जणांचे प्राण वाचले. या वेळी आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव डी. के. जैन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, चेंबूर विभागाचे स्थानिक नगरसेवक सुषम सावंत आदी उपस्थित होते. 

‘आजच्या धकाधकीच्या जीवनात जेव्हा अशी दुर्दैवी परिस्थिती ओढावते, तेव्हा सामान्य माणसाने काय केले पाहिजे याचे उत्तम उदाहरण या तिघांनी घालून दिले आहे’, असे तावडे यांनी सांगितले.

 

‘या दुर्घटनेत जीवितहानी झालेल्या पीडितांच्या कुटुंबियांना उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहे’, असेही त्यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link