Next
‘प्राचीन भारतीय संस्कृतीत डिझाइनची परंपरा’
प्रेस रिलीज
Saturday, January 12, 2019 | 03:55 PM
15 0 0
Share this story

असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियातर्फे आयोजित १३ व्या पुणे डिझाइन फेस्टिव्हलच्या उद्घाटन सत्रात बोलताना अशोक चॅटर्जी

पुणे : ‘प्राचीन भारताचा इतिहास बघता एक मोठी डिझाईनची परंपरा आपल्या देशात आहे,’ असे मत सेंटर फॉर हेरीटेज मॅनेजमेंटचे सल्लागार आणि राष्ट्रीय डिझाइन संस्थेचे माजी संचालक अशोक चॅटर्जी यांनी व्यक्त केले. असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियातर्फे आयोजित १३ व्या पुणे डिझाइन फेस्टिव्हलच्या उद्घाटन सत्रात चॅटर्जी यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी ‘एनआयडी’चे माजी संचालक आणि प्रसिद्ध डिझाइन तज्ज्ञ विकास सातवलेकर, सतीश गोखले, आशिष देशपांडे, अश्विनी देशपांडे, बाळा महाजन, निश्मा पंडित, प्रकाश खानझोडे, नचिकेत ठाकूर, सिद्धार्थ काबरा, ऋग्वेद देशपांडे आदी उपस्थित होते. पुणे डिझाइन फेस्टिव्हल नगर रस्त्यावरील हयात रिजन्सी येथे सुरू असून, या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एका विशेष डिझाइन एक्स्पोचे आयोजनदेखील येथे करण्यात आले आहे. हे प्रदर्शन निशुल्क आहे.

चॅटर्जी म्हणाले, ‘प्राचीन भारतातील विविध काळातील प्रकल्प पाहिले असता आपल्या देशातील प्राचीन संस्कृतीत एक मोठी डिझाइन परंपरा दडल्याचे आपल्याला दिसून येईल. ज्यामध्ये त्यांनी अजिंठा, सांची स्तुप आणि ताजमहाल यांची उदाहरणे दिली. भारतीय डिझाइन परंपरेचा मूळ गाभ्यात सेवा, प्रेम आणि नम्रता यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. येणाऱ्या काळातदेखील या बाबींवर डिझाइन क्षेत्रात काम करणाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे.’

‘डिझाइन विषयाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था या गुण आणि परीक्षा पद्धतीचा अवलंब आजच्या काळात जास्त करताना दिसतात; परंतु तसे न करता विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देऊन त्यांची डिझाइन क्षमता वाढविण्यावर भर द्यावा,’ असे चॅटर्जी यांनी सांगितले; तसेच राष्ट्रीय डिझाइन संस्थेने अशा प्रकारचा अपारंपरिक दृष्टीकोन ठेवल्याने ही संस्था सक्षम डिझाइनर बनविण्यात यशस्वी झाली आणि त्यामुळे देशात डिझाइन व्यवसाय स्वरूपात स्थापित करणे शक्य झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.‘कोलॅबोरेट- एकत्र येऊन काम करणे’ अशी यंदाच्या पुणे डिझाइन फेस्टची थीम आहे. त्याविषयी बोलताना चॅटर्जी म्हणाले, ‘देशातील विविधता एकत्र आल्यास आश्चर्यकारक कामगिरी करू शकते. संत कबीर यांचे व्यक्तिमत्त्व, कार्य आणि शिकवण याबाबी अधोरेखित करतात. राष्ट्रीय डिझाइन संस्थेच्या यशामध्येदेखील विद्यार्थी-पालक-शिक्षक यांचा एकत्र येऊन एका क्रांतीकारी शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याच्या कोलॅबरेटिव्ह एफर्टचा मोठा वाटा आहे.’

‘युनायटेड नेशन्सच्या १७ सस्टेनेबल गोल्सकडे गांभीर्याने पाहिल्यास ते भविष्याचा डिझाइन अजेंडा स्थापित करत असल्याचे आपल्या लक्षात येईल आणि ही उच्च दर्जाची गुणवत्ता असलेल्या भारतीय डिझाइन्सला एक मोठी संधी असणार,’ असे भाकीत त्यांनी या वेळी केले.

तत्पूर्वी कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध गायक-संगीतकार वासू दीक्षित यांचे सादरीकरण झाले. सुरेश व्यंकट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link