Next
पुण्यात ‘जलोत्सव २०१९’चे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, February 21, 2019 | 01:12 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘रोटरी क्लब पुणे डिस्ट्रिक्ट ३१३१’तर्फे २३ फेब्रुवारी ते दोन मार्च २०१९दरम्यान पुण्यात ‘जलोत्सव २०१९’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘रोटरी क्लब पुणे डिस्ट्रिक्ट ३१३१’च्या वॉटर कमिटीचे अध्यक्ष सतीश खाडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

हा कार्यक्रम सकाळी १० ते सायंकाळी चार या वेळेत होणार आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड आणि जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांनी संयोजन केले आहे. पाण्याविषयी, पाणी वापर, बचत, पुनर्वापर यांविषयी जागरूकता, जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी हा जलोत्सव आयोजित करण्यात आला असून, या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जल क्षेत्रात असलेल्या कारकिर्दीच्या संधींवर मार्गदर्शन करण्यावर यावर्षी भर देण्यात येत आहे.

या उपक्रमाचा प्रारंभ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च (आयसर, पाषाण) येथे होत आहे. २३ फेब्रुवारी रोजी ‘आयसर’ संस्थेत प्रदीप लोखंडे, डॉ. अरविंद नातू, अशोक रूपनर यांच्या उपस्थितीत ‘जलोत्सव २०१९’च्या उपक्रमांचा अनौपचारिक प्रारंभ होत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या ‘रोटरी वॉटर ऑलिम्पियाड’ ही प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी होणार आहे.

या जलोत्सवादरम्यान विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. अरविंद नातू, उमेश मुंडले, व्ही. एम. देसाई, ओ. मणीवान्ना, प्रदीप पुरंदरे, उपेंद्र धोंडे, कृष्णा लव्हेकर, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. श्रीकांत गबाले, रवींद्र उलंघिवार, संजय इनामदार, प्रभात रंजन यांची व्याख्याने होणार आहेत. रोटरी वॉटर ऑलिम्पियाड स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दोन मार्च रोजी होणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link