Next
पुणे येथे हस्तकला सहयोग शिबीर
प्रेस रिलीज
Monday, February 26 | 02:28 PM
15 0 0
Share this story

हस्तकला सहयोग शिबिरात सहभागी स्टॉलची पाहणी करताना खासदार अनिल शिरोळे.पुणे : केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सूचनेनुसार येथे आयोजित करण्यात आलेल्या हस्तकला सहयोग शिबिराचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

गणेश पेठेतील काशी विश्वेश्वर मंदिर येथे हस्तकलेच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी खासदार शिरोळे म्हणाले, ‘केंद्र सरकार नेहमीच अशा उद्योगांना प्रोस्ताहन देत असते. अशा प्रकारच्या शिबिरातून स्थानिक कलाकारांना स्वउद्योग प्रसारासाठी चांगली संधी उपलब्ध होते. त्यामुळे अशा शिबिरांचे आयोजन सर्व ठिकाणी व्हावे. जेणेकरून अधिकाधिक लोक याच्याशी जोडले जातील आणि सरकाच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल.’

या प्रदर्शनात बांबू, हस्तकला, सुत, विणकाम, जरीकाम आदी उद्योगांच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link