Next
स्विगी पोहोचवणार आता वस्तूही घरपोच
BOI
Friday, February 15, 2019 | 02:34 PM
15 0 0
Share this story


बेंगळुरू : स्विगी ही ऑनलाइन घरपोच खाद्यपदार्थ सेवा देणारी कंपनी आता किराणा, औषधे आदी वस्तूही घरपोच देणार आहे. स्विगी स्टोअर्स नावाच्या या सेवेचा नुकताच  गुरूग्राम येथे प्रारंभ करण्यात आला.  

‘स्विगीने आपले कार्यक्षेत्र विस्तारण्याचा निर्णय घेतला असून, आतापर्यंत फक्त खाद्यपदार्थ घरपोच मागविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅपवरून ग्राहकांना किराणा, औषधे, दैनंदिन गरजेच्या वस्तूही  मागविता येतील,’ अशी माहिती कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्षा मजेटी यांनी ब्लॉगद्वारे दिली आहे. 

स्विगीचे संस्थापक नंदन रेड्डी, राहुल जेमिनी आणि श्रीहर्षा मजेटी

‘याद्वारे ग्राहकांना किरकोळ आणि घाऊक दालनांची सेवा ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने उपलब्ध होईल. ग्राहक स्विगीच्या सध्या अस्तित्वात असलेल्या अॅपच्या आधारे किराणा, भाजी, फळे, औषधे, आवश्यक वस्तूंपासून अगदी पानदेखील ऑनलाइन ऑर्डर करू शकतील. एका तासाच्या आत ग्राहकांना त्यांच्या ऑर्डरनुसार वस्तू घरपोच मिळतील,’असेही मजेटी यांनी म्हटले आहे. 

 ‘पहिल्या टप्प्यात २०० प्रकारच्या क्षेत्रातील तीन हजार पाचशे दुकानांशी भागीदारी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणतीही वस्तू ऑर्डर करता येईल; तसेच या अॅपमध्ये विविध ब्रँडस्, घाऊक, किरकोळ व्यापारी दालने यांची यादीही उपलब्ध करण्यात आली आहे. स्विगीने अपोलो फार्मसी, हेल्थ एच. के. आर्ट, गार्डीयन फार्मसी, फेर्न्स अँड पेटल्स आणि ऑनलाइन मांस पुरवठा करणारी कंपनी लीसियसशी भागीदारी केली आहे,’असेही त्यांनी स्पष्ट केले.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link