Next
‘खादी ग्रामोद्योग’च्या प्रदर्शनास चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, October 02 | 06:20 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘मैत्रीण’ संस्थेतर्फे खादी ग्रामोद्योग आणि महिला उद्योजक निर्मित विविध उत्पादनांच्या प्रदर्शनास प्रारंभ झाला असून या प्रदर्शनाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे.

प्रदर्शनात खादी ग्रामोद्योग वस्तू तसेच महिला उद्योजकांनी केलेल्या पोशाख, बाटिक -बांधणीच्या साड्या व ड्रेस मटेरियल, कलात्मक वस्तू, दागिने, फराळाचे पदार्थ, रांगोळ्या, भेटवस्तू, सिल्क साड्या यांचा समावेश आहे. नागपूर, अकोला येथील महिला उद्योजकांनी ओव्याच्या पानांपासून आणि सूर्यफुलांपासून तयार केलेले 'औषधी मध' विशेष आकर्षण आहे.

योगिता कुलकर्णी, अंजली जोशी, स्वाती चासकर, गीता कार्तिके यांचा प्रदर्शन संयोजनात सहभाग आहे.

‘महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी या प्रदर्शनद्वारे उत्तम संधी मिळत आहे. वर्धा, बडोदा येथील महिलांचा सुद्धा स्टॉल आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे,’ अशी माहिती योगिता कुलकर्णी यांनी दिली.

प्रदर्शनाविषयी :
कालावधी : आठ ऑक्टोबर २०१७ पर्यंत
वेळ : सकाळी ११ ते रात्री नऊ
स्थळ : गांधी भवन हॉल, अंध शाळेशेजारी, कोथरूड, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link