Next
जेम्स मिशनर, वसंत सरवटे, अच्युत बर्वे
BOI
Saturday, February 03, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

एखाद्या देशाच्या जन्मापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या विशाल कालपटलाचा वेध घेणाऱ्या महाकादंबऱ्या लिहिणारा जेम्स मिशनर, अर्कचित्रांना जन्म देणारे प्रख्यात व्यंगचित्रकार वसंत सरवटे आणि कथा-कादंबरीकार अच्युत बर्वे यांचा तीन फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा परिचय...
....  
जेम्स मिशनर 

तीन फेब्रुवारी १९०७ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला जेम्स मिशनर हा कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या एकापेक्षा एक भक्कम जाडजूड कादंबऱ्यांनी अनेकांना भुरळ पाडली होती. त्याची कादंबरी ज्या देशात, प्रदेशात घडत असेल, त्याविषयीचा त्याचा दांडगा अभ्यास असायचा आणि तो तिथल्या सर्वच गोष्टींचं इतक्या काही बारकाईने वर्णन करायचा, की अनेकांना त्या प्रदेशाची त्यामुळेच इत्थंभूत माहिती मिळून जायची! ‘हवाई’ आणि ‘दी सोर्स’सारख्या कादंबऱ्या वाचताना त्याचा चांगलाच प्रत्यय येतो. इबेरिआ, कॉव्हेनंट, पोलंड या कादंबऱ्यासुद्धा त्याच धर्तीच्या! 

आपल्या तरुणपणी त्याने अमेरिकेतली बहुतेक सर्वं राज्यं हिचहायकिंग करत पालथी घातली होती. त्याला १९४७ सालचा पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. त्याच्या पुस्तकांचा खप दहा कोटींच्या घरात गेला होता. 

दी फायर्स ऑफ स्प्रिंग, दी व्हॉइस ऑफ आशिया, दी ब्रिजेस अॅट तोको री, सायोनारा, कॅराव्हांस, दी ड्रिफ्टर्स, सेन्टेनिअल, स्पेस, जर्नी, कॅरिबिअन, मेक्सिको, टेक्सास, रीसेशनल, अशी त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 
...............

वसंत शंकर सरवटे

तीन फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले वसंत शंकर सरवटे हे महाराष्ट्रातले आघाडीचे व्यंगचित्रकार आणि अर्कचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.   

त्यांना बेंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट’चा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. पुलं, रमेश मंत्री, विंदा करंदीकर, विजय तेंडुलकर यांच्या पुस्तकांसाठी त्यांनी काढलेली चित्रं विशेष लोकप्रिय झाली.

‘ललित’च्या पहिल्या अंकापासून जवळपास ४२ वर्षं त्यांनी सातत्याने केलेली मुखपृष्ठं तुफान गाजली आहेत.
  
व्यंगचित्र : एक संवाद, व्यंगकला-चित्रकला, सहप्रवासी, सावधान पुढे वळण आहे!, खडा मारायचा झाला तर!, खेळ रेषावतारी, खेळ चालू राहिला पाहिजे, परकी चलन, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

२४ डिसेंबर २०१६ रोजी त्यांचं निधन झालं.
..................

अच्युत महादेव बर्वे

तीन फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले अच्युत महादेव बर्वे हे कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. 

आंबट गोड, चंदनाचा उंबरठा, झोका, पाठमोरी, हँग ओव्हर, मातीचा वास, कॅलिडोस्कोप, सुखदा, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१६ एप्रिल १९८२ रोजी त्यांचं निधन झालं. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link