Next
ऑकलँडमध्‍ये दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रम
प्रेस रिलीज
Friday, October 19 | 02:52 PM
15 0 0
Share this story

न्युझीलंड : ऑकलँड दिवाळी फेस्टिवल हा शहराच्‍या सर्वांत उत्‍साहपूर्ण सांस्‍कृतिक सणांपैकी एक आहे. या वर्षी १९ ते २१ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत दरम्‍यान दिवाळीवर आधारित अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१९ ऑक्‍टोबर रोजी स्‍थानिक लोकांना, तसेच पर्यटकांना फ्रेबर्ग प्‍लेमध्‍ये रांगोळी स्‍पर्धा ‘चॉक इट अप’ आणि एलेन मेल्विले सेंटरमध्‍ये दिवाळीवर आधारित कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. पर्यटकांना मेंदीचा, इंटरअॅक्टिव्‍ह डिजिटल हिंदी भाषिक गेम्‍स, तसेच गोड मिठाईंपासून चमचमीत, नमकीन अशा विविध प्रकारच्‍या भारतीय पदार्थांचा आस्‍वाद घ्‍यायला मिळणार आहे.

दिवाळीचा मुख्य सण २० ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. एओटा स्‍क्‍वेअर स्‍टेज, क्‍वीन सेंट स्‍टेज आणि कॉर्नर ऑफ क्‍वीन अॅंड वेकफिल्‍ड या शहराच्या तीन मुख्‍य भागांत आयोजित केल्या जाणाऱ्या या सणात बॉलिवूड ते पंजाबी, गुजराती ते भरतनाट्यम, राजस्‍थानी ते हिंदुस्‍तानी अशा सादरीकरणांचे मिश्रण असणार आहे.

सणापूर्वी व सणादरम्‍यान वेक्‍टर लाइट्स रांगोळीच्‍या पारंपरिक कलाप्रकारातून प्रेरणा घेत १८ ते २१ ऑक्‍टोबरपर्यंत ऑकलँड हार्बर ब्रिज येथे लाइट शो सादर केला जाणार आहे. न्युझीलंड आधारित ऊर्जा कंपनी वेक्‍टर आणि ऑकलँड कौन्सिल यांच्‍यामधील स्‍मार्ट एनर्जी सहयोगाचा हा एक भाग आहे.

याविषयी सांगताना फेस्टिवलच्‍या निर्मात्या लीलाना मेरेडिथ म्‍हणाल्या, ‘वेक्‍टर लाइट्स ऑकलँड हार्बर ब्रिजवरील लाइट शोसह २०१८च्‍या फेस्टिवलमध्‍ये नवीन पैलूची भर करत असल्‍याचे पाहून खूप आनंद होत आहे. या लाइट शोमध्‍ये रांगोळीच्‍या आकर्षक रंगसंगती व डिझाइन्‍स सादर केल्‍या जाणार आहेत.’

ऑकलँड दिवाळी फेस्टिवल हा न्युझीलंडमधील सर्वांत लोकप्रिय सांस्‍कृतिक फेस्टिवल्‍सपैकी एक आहे. या फेस्टिवलला गेल्‍या वर्षी ५५ हजार लोक उपस्थित होते. या फेस्टिवलदरम्यान भारतातील कलहरी आर्ट अॅंड कल्‍चर अॅकॅडमी भांगडा, गिधा, जिंदावा, मालवाई आणि झूमर अशा विविध स्‍टाइल्‍समध्‍ये मनोरंजन सादर करेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link