Next
देशभर साजरा होणार ‘दान उत्सव’
दोन ते आठ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रम
प्रेस रिलीज
Friday, September 07 | 03:38 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘दान देणे हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या मदतीसाठी दान संस्कृतीचा उपयोग करत ‘दान उत्सव’ ही लोकचळवळ राबवली जाते.समाजाच्या भल्यासाठी वेळ, कौशल्ये, पैसे देणारी ही अनोखी मोहीम आहे. अशा या ‘दान उत्सवा’चा दहावा वर्धापनदिन दोन ते आठ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये मोठ्या संख्येने कलाकार, उच्चपदस्थ अधिकारी, मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांपासून गृहिणी, भाजीविक्रेत्यांपर्यंत सर्वजण सहभागी होणार आहेत’, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. 

‘गिव्हिंग ट्यूसडे  इंडिया’ दोन ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. त्यामध्ये क्राउडफंडिंग मोहिमेद्वारे यंदा १५ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील वीस शहरांमध्ये, ‘गूंज दान उत्सव बसेस’ शहरभर फिरणार आहेत. त्यामुळे लोकांना स्टेशनरी, खेळणी, कपडे व अन्य साहित्य यांची देणगी देता येईल. विविध शहरांतील शेकडो आयओसी पेट्रोल पंपांवर बिगर-नफा संस्थांना सहभागी होण्याची संधी मिळेल. लोकांना ऑनलाइन ग्रोसरी सुविधा, ट्रॅव्हल पोर्टल, कॅब सुविधा व फूड डिलिव्हरी सेवा याद्वारेही देणगी देता येईल. मुंबईमध्ये सहा ऑक्टोबर रोजी, महानगरपालिकेच्या शाळांमधील मुलांना वीस हजारांहून अधिक स्वयंसेवक पेपर बॅग करायला शिकवणार असून, पर्यावरण रक्षणाचे धडे देणार आहेत. नवी दिल्लीत पुस्तक देणगी मोहीम राबवण्यात येणार आहे. कोलकाता येथे पुजोर जामा मोहिमेद्वारे द्वारे गरजू मुलांना हजारो नवे कपडे दिले जाणार आहेत. चेन्नईमध्ये दोन ऑक्टोबर रोजी हजारो नागरिक एकत्र येऊन स्वच्छता व सफाई कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी (थँक यू मील)  भोजन  देणार आहेत. बेंगळुरूमध्ये शहराच्या विविध भागांमध्ये मुलांसाठी शंभर मैदाने तयार केली जाणार आहेत. 

या वर्धापनदिनानिमित्त विशेष लोगो तयार करण्यात आला असून, रॅपर ‘बिग डील’ उर्फ समीर मोहंती यांनी खास रॅप तयार केला आहे, तर लखनऊतील अमन शहापुरी यांनी दानाची महती सांगणारे अप्रतिम गाणे रचले आहे. 

गेल्यावर्षी या दान उत्सवात देशभरातील दोनशे शहरे व गावांमधील ६० लाख व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. 

दान दिल्याने केवळ ते स्वीकारण्याच्याच नाही, तर देणाऱ्याच्या चेहऱ्यावरही आनंद व हसू फुलते. सर्वांच्या पाठिंब्याने, वंचित व्यक्तींच्या जीवनात बदल घडवण्यासाठी, व्यक्ती व संस्थांमध्ये सामाजिक बांधिलकीची संस्कृती रुजवणे, हे या प्रयत्नांमागील उद्दिष्ट आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link