Next
ट्रान्सफॉर्मेशन सीरिजसाठी ‘येस बँक’ सज्ज
प्रेस रिलीज
Thursday, July 19, 2018 | 12:37 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘कोलॅबरेशन अॅज ए सर्व्हिस’च्या (सीएएएस) माध्यमातून भारताच्या नगरविकासातील आव्हाने स्वीकारण्यासाठी येस बँक ट्रान्सफॉर्मेशन सीरिजच्या सातव्या सत्रासाठी येस बँकेसह जागतिक स्तरावरील १२ प्रमुख उद्योग सज्ज झाले आहेत. स्मार्ट सिटीना भेडसावणाऱ्या समस्यांवरील उपाय शोधण्यासाठी जागतिक स्तरावरील ब्रॅंड, प्रमुख शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी आणि सरकार यांना एकत्र आणण्याचे बँकेचे हे नाविन्यपूर्ण, व्यापक आणि सर्वात मोठे प्रयत्न असून, याद्वारे स्मार्ट सिटीच्या विकासाला चालना मिळू शकणार आहे.

तंत्रज्ञान हा महत्त्वाचा घटक असल्याने मोठ्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर मायक्रोसॉफ्ट, सिस्को, आयबीएम आणि अॅडॉब या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमार्फत येस बँक भर देणार आहे. सर्वांना शिक्षण उपलब्ध व्हावे, यादृष्टीने ‘मूक’चा (MooC – मासिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस) वापर कसा करता येईल, याची पडताळणी शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेली कोर्सेरा करणार आहे. प्लास्टिकचा अतिवापर तसेच शहरांतील हवेचा घटणारा दर्जा यांसारख्या समस्या जाणून घेऊन यीएनडीपी आणि शेल यांसारख्या जागतिकस्तरावरील मोठ्या कंपन्या त्यांचे निराकारण करण्याचा प्रयत्न करतील. अर्बन लॅडर, बिग बास्केट, स्पोर्ट्ज इंटरअॅक्टिव्ह, बुकमायशो आणि टी-हब यांसारख्या भारतातील आघाडीच्या स्टार्टअप्स आणि इकोसिस्टीम्स देखील या उपक्रमात सहभागी आहेत.

यावर भाष्य करताना येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर म्हणाले, ‘आजच्या घडीला व्यवसाय आणि उद्योग हे एकट्याने कार्य करू शकत नाही आणि त्यामुळेच अंतर्गत सहयोग किंवा उद्योगाबाहेरील सहयोग हा अटळ आहे. त्याच अनुषंगाने ‘सीएएएस’ हे येस बँकेचे अभिनव प्रयत्न म्हणजे बँकेच्या एआरटी तत्त्वाचा विस्तार आहे; तसेच राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सृजनात्मक उपाययोजना पुरवण्याचा उद्देश बँकेचा आहे. विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि सूक्ष्मदृष्टीला प्रोत्साहन देऊन सरकारच्या सहयोगाने आमच्या जागतिक पातळीवरील भागीदारांसह भारताच्या नगरविकासातील आव्हानांचा स्वीकार करण्यास आम्ही खूपच उत्सूक आहोत.’

२०१०पासून सुरू झालेल्या ट्रान्सफॉर्मेशन सीरीजमध्ये जगभरातील संस्थांच्या ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. डेअरटूकॉम्पिटकडून (Dare2compete) २०१८ या वर्षात ट्रान्सफॉर्मेशन सीरिजला दुसऱ्या क्रमांकाची सर्वात प्रतिष्ठित अशी बी-स्कूल स्पर्धा म्हणून मानांकन देण्यात आले आहे. तंत्रज्ञानावर आधारित व्यवसायासंबंधी उपाययोजना सादर करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन सीरिजमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले.

पहिल्या फेरीतील सादरीकरणाच्या आधारे पहिल्या १५ संघांची निवड करण्यात आली. निती आयोगाच्या सहयोगाने राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्यावर त्यांना दुसऱ्या फेरीत काम करायचे आहे. त्यानंतर नोव्हेंबर २०१८मध्ये एक भव्य समारंभात प्रमुख उद्योगपती आणि मान्यवरांचा समावेश असलेल्या पॅनलमध्ये अंतिम सादरीकरण होईल. यापूर्वी, नाविन्यपूर्ण सौरऊर्जा उपायांसंदर्भात बँकेने नवीन आणि अक्षय्य उर्जा मंत्रालयाच्या सहयोगाने कार्य केले आहे.

पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या विजेत्यांना अनुक्रमे पाच लाख रुपये, तीन लाख रुपये आणि दोन लाख रुपये असे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय, येस बँकेच्या प्री-प्लेसमेंट इंटरव्ह्यूमध्येही या विजेत्यांना संधी मिळेल. यासंबंधीची अर्ज प्रक्रिया १८ जुलै ते २४ ऑगस्ट २०१८ या कालावधीत सुरू राहील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link