Next
‘नेत्यामध्ये नेतृत्वगुणांबरोबरच सर्वसमावेशकता महत्त्वाची’
पुस्तकाचे प्रकाशनाप्रसंगी डॉ. सुधीर कक्कर यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Monday, May 20, 2019 | 05:32 PM
15 0 0
Share this article:

अतुल देऊळगावकर लिखित ‘विवेकीयांची संगती’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर

पुणे : ‘एखाद्या नेत्याची वक्तृत्वशैली, त्याचे भाषणकौशल्य हे महत्त्वाचे आहेच; मात्र याबरोबर त्या नेत्याची सर्वसमावेशकता ही महत्त्वाची आहे. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण संपूर्ण देशाने महात्मा गांधीच्या रूपाने पाहिले,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ मनोविश्लेषक व सांस्कृतिक मानसशास्त्रज्ञ डॉ. सुधीर कक्कर यांनी केले.

मनोविकास प्रकाशनातर्फे अतुल देऊळगावकर लिखित ‘विवेकीयांची संगती’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कक्कर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. बीएमसीसी रस्त्यावरील गोखले इन्स्टिट्यूट येथील काळे सभागृह या ठिकाणी हा कार्यक्रम पार पाडला. चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, मनोविकास प्रकाशनचे अरविंद व आशिष पाटकर हे देखील यावेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. कक्कर म्हणाले, ‘या वर्षी देश गांधीजींची १५०वी जयंती साजरी करतीत असताना नेतृत्व गुणांबद्दल चर्चा होणे हेदेखील महत्त्वाचे आहे. गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम ही विवेकाची उदाहरणे देशाने पाहिली आहेत. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या रूपाने एक सर्वसमावेशक नेतृत्व आपण अनुभविले. आज नेते हे लोकानुयायी आहेत, मात्र महात्मा गांधी तसे नव्हते. ते चांगले वक्ते नव्हेत, त्यांच्यामध्ये भाषणकौशल्य नव्हते; मात्र असे असले, तरी त्यांच्या मागे लोक जात असत. लोकांना स्वत:कडे खेचून आणण्याची विश्वासार्हता त्यांच्यामध्ये होती.’    

डॉ. सुधीर कक्कर‘आज कोणालाही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अथवा औद्योगिक क्षेत्रात नेतृत्व करायचे असेल त्यामध्येही सर्वसमावेशकता असणे आवश्यक आहे. जात, धर्म, पंथ या संकुचिततेच्या पलीकडे जाऊनच ही सर्वसमावेशकता येऊ शकेल. महात्मा गांधींनी देशाला दिलेल्या आधात्मिकतेला मानसशास्त्राचीदेखील जोड होती आणि म्हणूनच त्यांच्या नेतृत्त्वात आपल्याला करुणा, माया, कणव दिसून येते,’ असेही डॉ. कक्कर म्हणाले. 

‘सदसदविवेकबुद्धी जागृत ठेऊन मागील शतकात निस्वार्थीपणे कार्य केलेल्या विवेकीजनांची कहाणी आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. जागतिक पातळीवरचे ‘वल्ली’ या पुस्तकाच्या रूपात आपल्याला भेटतील,’ असे कुलकर्णी यांनी या प्रसंगी सांगितले.     

केवळ स्वत:साठीच व स्वत: पुरतेच जगणे हे प्राणीपातळीवरचे आहे असे मानणाऱ्या व जात, धर्म, वर्ग, लिंग या सर्व भेदांच्या पलीकडे जाणारा सुसंस्कृत व विवेकी समाज घडविण्यासाठी आयुष्य वेचलेल्या धुरिणांविषयीची कृतज्ञता लेखक देऊळगावकर यांनी आपल्या ‘विवेकीयांची संगती’ या पुस्तकामधून व्यक्त केली आहे.

या पुस्तकात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, कृषीतज्ज डॉ. नॉर्मन बोरलॉग, सत्यजित राय, मृणाल सेन, लॉरी बेकार, कुमार गंधर्व, व्यंगचित्रकार केशव आणि सुरेंद्र, डॉ. सुधीर कक्कर, कुमार केतकर, प्रा. भागवतराव धोंडे, जयंत वैद्य यांसारख्या व्यक्तींवरील लेखांचा समावेश असल्याचे देऊळगावकर यांनी नमूद केले. 

अरविंद पाटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search