Next
‘रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी देशाचा प्रथम नागरिक बनला पाहिजे’
BOI
Saturday, October 07 | 11:48 AM
15 0 0
Share this story

भाऊराव पाटीलपंढरपूर : ‘रयत शिक्षण संस्था ही गोरगरिबांच्या मुलांसाठी एक आशेचा किरण आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी या देशाचा प्रथम नागरिक बनला पाहिजे,’ अशी अपेक्षा या संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे सदस्य मारुती पाटील यांनी व्यक्त केली.

रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयात गेल्या आठवड्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आबासाहेब देशमुख यांनी भूषवले.

पाटील म्हणाले, ‘रयत शिक्षण संस्था ही गोरगरिबांच्या मुलांसाठी एक आशेचा किरण आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी या संस्थेची उभारणी केली आहे. आशिया खंडातील ही सर्वांत मोठी शिक्षण संस्था आहे. रोपळे शाखेची मुहुर्तमेढ निंबाळकर बंधूंनी रोवली आणि त्याला आकार देण्याचे काम शिवाजीभाऊंनी केले. त्याला सर्व गावकऱ्यांनी साथ दिल्याचा आनंद वाटतो. या संस्थेतील कर्मचारी अंतःकरणापासून काम करतात. या शाळेत शिकलेला विद्यार्थी या देशाचा प्रथम नागरिक बनला पाहिजे. त्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करण्याची ही वेळ आहे.’

कर्मवीर पाटील जयंतीच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून रोपळे विकास प्रतिष्ठानतर्फे संचालक अर्जुन भोसले यांच्या हस्ते पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील अशी सुमारे २० हजार रुपये किंमतीची पुस्तके भेट देण्यात आली.

या वेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य देशमुख, सहसचिव गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व अहवालवाचन मुख्याध्यापक बागल यांनी केले. सूत्रसंचालन कंदले व एम. एन. लंकेश्वर यांनी केले. सोमनाथ जगताप यांनी आभार मानले.

या वेळी ‘रयत’चे सहसचिव व्ही. एम. महाडिक, स्कूल कमिटी सदस्य शिवाजी पाटील, सरपंच दिनकर कदम, सर्वसाधारण सभेचे सदस्य बाळासाहेब पाटील, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले, पंचायत समितीचे माजी सदस्य महेश कदम, विलास भोसले, पर्यवेक्षक टी. बी. ताटे, माजी मुख्याध्यापक एम. जे. चौधरी, माधव कारंडे, दक्षिण विभागाचे माजी इन्स्पेक्टर गुलाबराव माने, गादेगाव प्रशालेचे माजी मुख्याध्यापक पांडुरंग सोलनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बी. एम. पुजारी, आर. ए. व्यवहारे, सी. एस. मलपे, एन. जी. वाघमारे, डी. एम. गोडे, डी. बी. फटे, एस. एस. घोरपडे,  पी. टी. ताटे, एस. पी. रोकडे, के. डी. पानसांडे,  ए. बी. भोसले, पी. ए. भोसले, माळी आदींनी प्रयत्न केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link