Next
अष्टावक्र-नाथगीता
BOI
Friday, August 02, 2019 | 10:49 AM
15 0 0
Share this article:

गीता म्हटले, की महाभारतात कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली अध्यात्म दर्शन घडविणारी गीता आठवते. अर्जुनाला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी श्रीकृष्णाने युद्धभूमीवर त्याला केलेला उपदेश म्हणजे गीता; पण अष्टावक्र मुनींनी सांगितलेली गीता ही त्यापेक्षा वेगळी आहे. यात आत्मज्ञानी अष्टावक्र मुनी आणि राजा जनक यांच्यातील संवाद आहे. पूर्ण वैराग्य आणि आत्मज्ञान कसे प्राप्त होईल, यासाठी अष्टावक्र मुनींनी ही गीता सांगितली आहे. आत्मज्ञानप्राप्तीसाठी साधकाने काय केले पाहिजे, हे यात सांगितले आहे. या गीतेचे विवेचन डॉ. वृषाली पटवर्धन यांनी ‘अष्टावक्र-नाथगीता’ या पुस्तकातून केले आहे. आठ मितींनी विस्तारत जाणाऱ्या आत्म्याच्या जाणिवेचा प्रवास यातून दिसतो. सततच्या ध्यासाने आणि तळमळीने तो जाणून घेताना सूक्ष्म आणि एकाग्र मनाने भौतिकापलीकडील ज्ञान कसे आत्मसात करावे, याचे मार्गदर्शन या ग्रंथात अत्यंत सोप्या व सरळ भाषेत केले आहे. आत्मचिंतनातून ज्ञान, भक्ती आणि वैराग्यप्राप्तीद्वारे आत्मबोधाचा मार्ग या ग्रंथाच्या आधारे वाचकांना सहज समजेल.

पुस्तक : अष्टावक्र-नाथगीता
लेखिका : डॉ. वृषाली पटवर्धन
प्रकाशन : आरंभ प्रकाशन
पृष्ठे : ३२१
मूल्य : ३०० रुपये

(‘अष्टावक्र-नाथगीता’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 18 Days ago
Is it really different from the the others ?
0
0

Select Language
Share Link
 
Search