Next
इराकच्या नागरिकावर ‘इनामदार’मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
अ‍ॅबडॉमिनल एओर्टिक अॅन्युरिझम या पोटाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त
प्रेस रिलीज
Saturday, November 17, 2018 | 04:55 PM
15 0 0
Share this story

पुणे : अ‍ॅबडॉमिनल एऑर्टिक अ‍ॅन्युरिझम या पोटाच्या  दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेल्या इराकमधील रुग्णावर फातिमानगर (वानवडी, पुणे) येथील इनामदार मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने यशस्वी उपचार केले. परदेशातूनही पेशंट उपचारासाठी पुण्यात येत असल्याने मेडिकल टुरिझम वाढत असल्याचे दिसून येत आहे.

अ‍ॅबडॉमिनल एऑर्टिक अ‍ॅन्युरिझमला ‘ट्रीपल ए’ असे म्हणतात. ज्यामध्ये एओर्टाची (शरीरातील सर्वांत मोठी धमनी) भिंत कमकुवत होऊन धमनीच्या साधारण लांबीपेक्षा ५० टक्के जास्त फुगवटा होतो. एओर्टा हे हृदयामधून येणाऱ्या रक्ताच्या सतत दबावाखाली असते. हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर एओर्टाच्या भिंती रुंद होतात व पुन्हा मागे सरकतात. ज्यामुळे आधीच कमकुवत झालेल्या भिंतीवर अधिक दबाव किंवा ताण आणतात. यामुळे एओर्टाची भिंत फुटण्याचा धोका उद्भवतो.

या विषयी माहिती देताना इनामदार हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. परवेज इनामदार म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी एक ६९ वर्षीय इराकी रुग्णाला उदर व पाठीच्या दुखण्याचा १० ते १५ दिवसांपासून त्रास होत होता. त्यांना उच्च रक्तदाबाचे उपचार सुरू होते. त्यांना होणाऱ्या वेदनांच्या निदानासाठी सोनोग्राफी करण्यात आली. त्यातून डॉक्टरांना अ‍ॅबडॉमिनल एओर्टा अ‍ॅन्युरिझम हा दुर्मिळ आजार असल्याची शंका आल्याने सिटी अँजिओग्राफी करण्यात आली. ज्यामध्ये हा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाले.’

इराक येथून आलेला रुग्ण‘रुग्णाचे वय व वैद्यकीय स्थिती लक्षात घेता कुठल्याही प्रकारची गुंतागुंतीची प्रक्रिया करण्यामध्ये जोखीम होती. भूल दिल्यानंतर उद्भवणारी संभाव्य जोखीम आणि त्यांची आरोग्य स्थिती याचा विचार केला. त्यानंतर आम्ही ही प्रक्रिया दोन टप्प्यांत करण्याचे ठरविले. पहिल्या टप्प्यात मूत्रपिंड निकामी होण्यापासून वाचविण्यासाठी, तसेच रक्ताभिसरण व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी मूत्रपिंडाला सर्जिकल बायपास व्हेसलग्राफ्टस (रक्ताभिसरण कायम ठेवण्यासाठी निर्माण केलेला पर्यायी मार्ग) निर्माण करण्यात आले. याचबरोबर त्यांना अखंड अतिदक्षता सेवा देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात त्यांच्यावर एंडोव्हस्क्युलर स्टेंट शस्त्रक्रिया करण्यात आली,’ असे डॉ. इनामदार यांनी सांगितले.

डॉ. शार्दुल दाते, डॉ. ए. सी. चोपडावाला, डॉ. अनमोल एम., भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पी. आणि अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. के. तिवारी यांच्या नेतृत्वाखाली इतर सहकारी डॉक्टरांचा यामध्ये समावेश होता.

‘धूम्रपान टाळल्यास व आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवल्यास हा रोग टाळता येऊ शकतो,’ असे इनामदार हॉस्पिटलमधील वैद्यकीय प्रशासक डॉ. समीर शेख यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link