Next
चतुरंग प्रतिष्ठानतर्फे डॉ. आशुतोष जावडेकर यांच्यासोबत गप्पांचा कार्यक्रम
BOI
Monday, August 05, 2019 | 03:11 PM
15 0 0
Share this article:

डॉ. आशुतोष जावडेकरपुणे : रसिक पुणेकरांसाठी येत्या रविवारची संध्याकाळ सुरेल संध्याकाळ ठरणार आहे. प्रख्यात लेखक, कवी, गायक आणि संगीतकार असे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व अर्थात डॉ. आशुतोष जावडेकर यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी रविवारी मिळणार आहे.

 चतुरंग प्रतिष्ठानने या मुक्तसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, लघुपट निर्माते, राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) दिग्दर्शन विभाग प्रमुख मिलिंद दामले डॉ. आशुतोष जावडेकर यांच्याशी संवाद साधणार आहेत. रविवारी, ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

कार्यक्रमाविषयी : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे डॉ. आशुतोष जावडेकर यांच्याशी संवाद 

स्थळ : पत्रकार भवन, गांजवे चौक
दिवस व वेळ : रविवार, ११ ऑगस्ट २०१९, संध्याकाळी ६ वाजता.  

अधिक माहितीसाठी : http://www.chaturang.com/?upcoming_events=dr-
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search