Next
एडीपीचा अकरावा ‘फॅमिली डे’ साजरा
प्रेस रिलीज
Friday, March 09 | 02:21 PM
15 0 0
Share this story


पुणे : एडीपी प्रायव्हेट लिमिटेडने कंपनीतील अकरावा  ‘फॅमिली डे’  मगरपट्टा भागातील लक्ष्मी लॉन्स येथे साजरा केला. तब्बल सात हजार जणांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. एडीपीतील जागतिक स्तरावरील वरिष्ठ अधिकारी, तीनशे एडीपीअर्सनी दिलेला विशेष परफॉर्मन्स हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.

एडीपीमध्ये एक उत्तम संस्कृती रुजवून काम करण्यासाठी हे एक सर्वोत्तम स्थळ म्हणून विकसित करण्यात मोठे योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही कंपनीच्या परिवारात सामावून घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो.‘एम्प्लॉयर ऑफ चॉइस’ या कंपनीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याची संकल्पना  यंदा  ‘स्वरांग१८’ अशी होती. 

या महासोहळ्यासाठी तीन महिन्यांपूर्वीपासून तयारी सुरू झाली होती.  अनेक मजेदार आणि कल्पक कार्यक्रमपूर्व उपक्रम घेण्यात आले. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना उद्देशून बोलताना एडीपी प्रायव्हेट लिमिटेडचे महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक छायानाथ मैसोर (एमके) म्हणाले, ‘हा आपल्यासाठी एक विशेष सोहळा आहे. भारतातील गेल्या १९ वर्षांतील, तर पुण्यातील गेल्या ११ वर्षांतील यश साजरे करण्यासाठी आपण जमलो आहोत. एडीपी परिवाराच्या ठाम पाठिंब्यामुळे हा प्रवास आपल्याला शक्य झाला आहे. एडीपीच्या भारतातील यशामध्ये मोठे योगदान देणाऱ्या आमच्या विस्तारित कुटुंबासोबत यश साजरे करण्यासाठी दरवर्षी आपण एडीपी इंडिया ‘फॅमिली डे’ आयोजित करतो. एडीपीच्या भारतातील यशामधील प्रत्येक व्यक्तीच्या योगदानाची दखल घेणे हे याचे  उद्दिष्ट आहे.’

या वेळी सादर करण्यात आलेल्या नृत्य रचना आणि नाटकांना प्रेक्षकांनी उत्स्फुर्तपणे दाद दिली. प्रेक्षकांनी प्रत्येक नाटकाला जोरदार टाळ्यांनी पावती दिली. 
कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे भारतीय पद्धतीने, ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाची सांगता भोजन आणि डीजे स्पिन मास्टर कझीमच्या(कॅझ) सादरीकरणाने झाली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link