Next
रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन
BOI
Tuesday, February 26, 2019 | 05:44 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील सावरकरांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन करताना विद्यार्थी आणि मान्यवर

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त २६ फेब्रुवारी २०१९ रोजी शहरातील पतितपावन मंदिर संस्थेतर्फे आदराजंली वाहण्यात आली. रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील सावरकरांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन करण्यात आले; तसेच गाडीतळ येथील सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

रत्नागिरीत स्थानबद्ध असताना हिंदू जातीतील सार्‍यांना मंदिरप्रवेश मिळावा यासाठी सावरकरांच्या प्रेरणेने भागोजीशेठ कीर यांनी पतितपावन मंदिर उभारले. त्यामुळे या मंदिर संस्थेतर्फे सावरकरांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. रत्नागिरी जिल्हा कारागृहात यापूर्वी वारसा म्हणून सावरकरांची कोठडी जतन करण्यात आली होती. तिचे सावरकरांची स्मृती वास्तू म्हणून रूपांतर झाले आहे. येथेही पतितपावन मंदिर संस्थेतर्फे अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी अध्यक्ष अ‍ॅड. बाबा परुळेकर, सचिन मुळ्ये, सोहम मुळ्ये, संतोष नेने, स्वरूप नेने, दादा कांबळे, नितीन गुरव, उन्मेश केळकर, बावा वाडेकर, श्रीरंग प्रभुदेसाई, माधव शेंबेकर, जयंत प्रभुदेसाई, मोहन दामले, मकरंद पटवर्धन, कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख, तुरुंगाधिकारी अमेय पोतदार, राजापूरहून आलेले प्रशांत पाध्ये, अनंत रानडे आदी उपस्थित होते. त्यानंतर सावरकरांच्या जीवनावरील लघुपट दाखवण्यात आला.

कारागृहातील स्मारकाला पालिकेतर्फे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, सभापती सोहेल मुकादम, बिपीन बंदरकर आदींसह अन्य कर्मचार्‍यांनीही पुष्पहार अर्पण केला. आज दिवसभर विविध संस्था, संघटनांच्या वतीने सावरकरांना अभिवादन करण्यासाठी कारागृहातील स्मारकात गर्दी झाली होती.

लक्ष्मी चौक येथील सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना मान्यवर

दरम्यान, आज पहाटे भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा वचपा घेत पाकिस्तानवर बॉम्बफेक केला आणि स्वातंत्र्यवीर सावकरांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. ‘पाकड्यांचे घातले तेरावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जवानाचे अभिनंदन’ असा फलक पतितपावन मंदिराबाहेर झळकला.

सावरकरांना आत्मार्पण दिनानिमित्त आदरांजली
ब्राह्मण जागृती सेवा संघ आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानात केलेल्या कारवाईबाबत हवाई दलाचे अभिनंदन करण्यात आले. भारताने केलेली ही कारवाई म्हणजे आजच्या या आत्मार्पण दिनानिमित्त सावरकरांना आदरांजली वाहिली असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. भारत माता की जय, वंदे मातरम्, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, भारतीय सैन्य दलाचा विजय असो, अशा घोषणांनी शहरातील लक्ष्मी चौक दणाणून गेला. या वेळी श्रीरंग मुळ्ये, योगेश हळबे, राजेंद्र पटवर्धन, सुनील मुळ्ये, जयंत आठल्ये, श्रीपाद मराठे, अ‍ॅड. प्रिया लोवलेकर, रुद्रांश लोवलेकर, राधिका वैद्य, सिद्धेश मराठे, तन्मय दाते, अ‍ॅड. सचिन रेमणे, दीपक उकिडवे आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search