Next
हॅरॉल्ड रॉबिन्स
BOI
Monday, May 21, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

सत्ता, पैसा, उत्तान शृंगार आणि गुन्हेगारी जगताच्या गोष्टींनी ठासून भरलेल्या ज्याच्या पुस्तकांचा विक्रमी खप झालाय, त्या हॅरॉल्ड रॉबिन्सचा २१ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
...... 
२१ मे १९१६ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला हॅरॉल्ड रॉबिन्स हा आधुनिक जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवरच्या कादंबऱ्या लिहिणारा प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय कादंबरीकार! सत्ता, पैसा, शृंगार आणि गुन्हेगारी जगताच्या गोष्टींनी भरलेल्या त्याच्या पुस्तकांचा जवळपास ३२ भाषांमध्ये अनुवाद झाला असून, ७५ कोटींहून अधिक प्रतींचा विक्रमी खप झाला आहे! उत्तम कथाकथनाची हातोटी लाभलेल्या हॅरॉल्ड रॉबिन्सच्या २५हून जास्त कादंबऱ्या या बेस्ट सेलर यादीत झळकल्या आहेत. 

‘नेव्हर लव्ह ए स्ट्रेंजर’ ही त्याची पहिलीच कादंबरी लोकांना पसंत पडली होती आणि त्यावर सिनेमाही बनला. पुढे त्याने ड्रीम मर्चंट्स, ए स्टोन फॉर डॅनी फिशर अशा कादंबऱ्या लिहिल्या. त्या लोकप्रिय झाल्या आणि त्यांच्यावरही फिल्म्स बनल्या.

त्याला खरं यश आणि तुफान नाव मिळालं ते ‘कार्पेटबॅगर्स’ या कादंबरीमुळे! एका धनाढ्य विमान कंपनीचा मालक आणि एका हॉलीवूड सुंदरीची कथा सांगणारी ही कादंबरीसुध्दा उत्तान शृंगार आणि पैशाचा खेळ मांडत पुढे जाणारी. याही कादंबरीवर सिनेमा बनला आणि कादंबरी चांगलीच गाजली. 

दी सिक्रेट, दी अॅडव्हेन्चरर्स, गुडबाय जेनेट, ड्रीम्स डाय फर्स्ट, मेमरीज ऑफ अनदर डे, दी बेट्सी, दी लोनली लेडी, दी इनहेरीटर्स, दी स्टॅलीयन, दी रेडर्स, दी स्टोरीटेलर, हार्ट ऑफ पॅशन, दी बिट्रेयर्स, टायकून, स्पेलबाइंडर, नेव्हर लीव्ह मी, स्टिलेट्टो, दी पिरान्हाज, सिन सिटी, दी कर्स, ७९ पार्क अव्हेन्यू, प्रीडेटर्स, अशा त्याच्या कादंबऱ्या लोकप्रिय आहेत.

१४ ऑक्टोबर १९९७ रोजी त्याचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search