Next
‘जेएमडी मेडिको’तर्फे ‘जेईएमपी’चे अनावरण
प्रेस रिलीज
Tuesday, April 24 | 01:58 PM
15 0 0
Share this story

मुंबई : जेएमडी मेडिको सर्व्हिसेस लिमिटेडने जेएमडी मेडिको इंटरप्रेन्योर्स मेंटोर प्रोग्रामची (जेईएमपी) घोषणा केली आहे. ‘जेईएमपी’ हा एक वेगळ्या प्रकारचा देखरेख उपक्रम आहे जो चांगली गुणवत्ता असलेल्या उद्योजकांना चालना आणि पाठिंबा देईल. होतकरू उद्योजकांना त्यांची उद्योजकतेची स्वप्न साकार आणि साध्य करण्यासाठी व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने याची रचना करण्यात आली आहे.

‘जेएमडी मेडिको’ ही आयुर्वेदिक आणि हर्बल उत्पादन कंपनी आहे जी संपूर्ण कुटुंबासाठी विविधता असलेल्या उत्पादनांची श्रेणी आणि पोर्टफोलियो देऊ करते. आयुर्वेदिक उत्पादनांची ही व्यापक श्रेणी आरोग्य, केस, त्वचा यांची निगा आणि एकूण शरीराची निगा अशा प्रकारांसाठी आहे. ज्यातून अनेक विकार आणि आजारांवर उपाय मिळतात. ‘जेएमडी मेडिको’ची सर्व उत्पादने १०० टक्के हर्बल आहेत ज्यांचा कोणताही दुष्परिणाम नाही.

‘जेईएमपी’ उपक्रम हा सध्याच्या आणि नवीन उद्योगांना त्यांच्या उद्योगात भरारी घेण्यासाठी आहेउद्योजकांना उत्तेजन देण्यासाठी ‘जेएमडी मेडिको’ बिगर बँकिंग वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून देत लवचिकता उपलब्ध करणार आहे. व्यवसायाची ही संधी पार्ट टाईम अथवा फूल टाईम म्हणून घेता येऊ शकते.

‘जेईएमपी’साठी नोंदणी करणारी व्यक्ती प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपयांपर्यंत मिळकत करू शकते, जे त्यांच्या भाग, स्थान आणि गुंतवणुकीच्या प्रकारावर अवलंबून असेल. जे उद्योजक ‘जेईएमपी’साठी फूल टाईम सहभागी होणार आहेत ते साधारण प्रत्येक महिन्याला यापेक्षा जास्त मिळकत करू शकतील.

या विषयी अधिक माहिती देताना ‘जेएमडी मेडिको’चे चेअरमन जगदीश पुरोहित म्हणाले, ‘जेईएमपी च्या अनावरणाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे जो देशातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘जेएमडी मेडिको’चा पुढाकार आहे. ‘जेईएमपी’द्वारे आम्ही उद्योजक होण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांना प्रवासाची सुरुवात करण्यासाठी व्यासपीठ देऊ इच्छितो. आम्ही अशा व्यक्तीलाही मदत करणार आहोत ज्यांना आपले उद्योजकतेचे स्वप्न पुरे करण्यासाठी प्राथमिक भांडवलाची गरज आहे.’

‘आम्हाला असे वाटते की देशातील उद्योजकता आणि स्टार्ट-अप्स ही नवीन युगाशी आणि तंत्रज्ञान उद्योगाशी संबंधित आहेत. आयुर्वेद आणि वैदिक ज्ञान हे जगाला भारताकडून मिळालेली भेट आहे. आम्हाला या क्षेत्रातील उद्योजकांना चालना आणि पाठबळ द्यायचे आहे. ‘जेईएमपी’ ही केवळ देशातील आयुर्वेदिक चळवळीबरोबर जोडण्याचीच नाही, तर मिळकत करून आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होण्याची संधी आहे. ‘जेईएमपी’च्या सुरुवातीने आम्ही दहा हजार स्वयंरोजगार आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत,’ असे पुरोहित यांनी सांगितले.

‘हे केवळ उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक व्यक्तींपर्यंत मर्यादित नाही, तर ‘जेईएमपी’ हे लाखो रिटेलर्स, किराणा स्टोअर्स, विक्रेते आणि केमिस्ट यांच्यासाठी ही आहे जे कंपनीशी थेट जोडू शकतात आणि आपले नफ्याचे प्रमाण वाढवू शकतात,’ असे ‘जेएमडी मेडिको’चे सीइओ अनिल पुरोहित म्हणाले.

अधिक माहितीसाठी : www.jmdmedicoonline.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link