Next
‘प्रिय बाबांस...’ कवितेच्या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद
‘उपेक्षित बाप’ मांडणारा संजय गगे-खरीडकर यांचा कार्यक्रम
दत्तात्रय पाटील
Wednesday, October 31, 2018 | 11:44 AM
15 0 0
Share this storyशहापूर :
बहुतेक साहित्यिकांनी ‘आई’वर भरभरून लिहिले आहे. काही साहित्यिकांनी ‘बापा’वरही लिहिले आहे; पण त्यातही मारकुटा, दारूडा, बेजबाबदार, अडाणी बापच दाखवण्याचे प्रमाण अधिक. परंतु ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील खरीड गावचे पोलीस पाटील संजय गगे-खरीडकर ‘प्रिय बाबांस’ या कवितांच्या कार्यक्रमाद्वारे, उपेक्षित राहिलेला बाप मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.

ते बापाविषयी लिहितात -

किती आले, किती गेले पावसाळे..
कधी सुके, कधी ओले पावसाळे...
सोसले, पण नाही मोजले पावसाळे...
डोळ्यातील बाबाच्या नाही संपले पावसाळे..

या कार्यक्रमातून ते आपले सहकारी गायक प्रकाश धानके व गायक डॉ. गंगाराम ढमके यांच्यासोबत बापाची विविध रूपे मांडतात. शेतात राबणारा बाप, कुटुंबाची काळजी करणारा बाप, मुलांसाठी स्वतःच्या स्वप्नांची राखरांगोळी करणारा बाप, गोठ्यात रमणारा बाप, निसर्गावर नितांत प्रेम करणारा बाप मांडण्याचा प्रयत्न ते करतात. गणेशोत्सव, नवरात्र, कोजागिरी, दिवाळी पहाट अशा औचित्याने या कार्यक्रमाचे आयोजन करून महाराष्ट्रातील विविध संस्था व मंडळांनी या संकल्पनेचे स्वागत केले आहे.

अल्पावधीत नावारूपाला आलेल्या या कार्यक्रमाला मिळालेल्या स्थानिक प्रतिसादानंतर आता जिल्ह्याबाहेरही प्रयोग होऊ लागले आहेत. नुकतेच सातारा जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन करून सोनके गावकऱ्यांनी कवी संजय गगे-खरीडकर यांना ‘लागिर झालं जी’ या मालिकेतील कलाकार हेमंत साळुंखे यांच्या हस्ते सन्मानित केले.एका कवितेत संजय गगे-खरीडकर म्हणतात -

उन्हातान्हात राबणारा माझा बाप मला 
विठ्ठलापेक्षा कधी कमी वाटत नाही..
किती आली पाखरे, किती गेली पाखरे पंढरीत त्याच्या,
पण कुठल्याच पाखराने त्याचं शेत कधी बाटत नाही..
   
लहानपणीच पितृछत्र हरवलेले संजय गगे-खरीडकर बापावर नितांत प्रेम करतात. याच प्रेमातून या कार्यक्रमाची संकल्पना रुजली. ते केवळ मनोरंजनासाठी कविता न लिहिता उपेक्षित बाप, निसर्ग, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील वास्तव रोखठोक भूमिकेद्वारे मांडताना दिसतात. यासाठी अनेक कविसंमेलने, काव्यस्पर्धा, विविध कार्यक्रमांत ते सहभागी होतात. विशेष उपक्रम राबवतात. आतापर्यंत त्यांच्या या प्रयत्नांसाठी त्यांना अनेक संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या सामाजिक व पोलीस पाटीलकीच्या योगदानासाठी अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत.

(वडील आणि मुलांमधील नाते उलगडणारी वटवृक्षाच्या छायेत ही लेखमाला वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  )
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
गणेश विशे About 137 Days ago
संजय सर जबरदस्त संकल्पना आपण प्रत्यक्षात उतरवली आणि खरोखरच वेगवेगळ्या भूमिकेतील बाप आपण समाजासमोर मांडला..👌
0
0
Sanjay Vishnu Jadhav About 138 Days ago
Khup Chan Sir
0
0
राजेश पडवळ About 138 Days ago
उपेक्षित बापाला न्याय देण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न. ...खूपच छान सर दखलपात्र मिडिया स शुभेच्छा.
0
0
Prakash Gopal Dhanke About 138 Days ago
संजयजी गगे खरीडकर... यांच्यातील काव्यप्रतिभा अधिकाधिक बहरत जावो... हि सदिच्छा! Bytes of India मिडीयास खूप खूप शुभेच्छा!
0
0
संजय गगे खरीडकर About 139 Days ago
आपल्या दिलेल्या प्रसिद्धीने मला ह्या कार्यक्रमास ऊर्जा मिळाली...उपेक्षित बाप जनसामान्यापर्यत पोहचविण्यास मदत झाली..पत्रकार दत्ता पाटील सर आणि bytes of India चे मनपूर्वक धन्यवाद..
0
0

Select Language
Share Link