
हिमायतनगर : शहरातील जि. प. केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा येथे नव्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनील चव्हाण, तर उपाध्यक्षपदी किरण बिचेवार यांची निवड पालक सभेमध्ये करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्याम रायेवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख कल्याणकर सर उपस्थित होते. ही निवड पालक सभेतून इयत्तानिहाय व संवर्गनिहाय याप्रमाणे झाली. सुनील नारायणराव चव्हाण यांची अध्यक्षपदी, तर किरण सुभाषराव बिचेवार यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. सदस्यपदी गोदावरीताई पांढरे, उज्ज्वला शिंदे, गोदावरीताई बलपेलवाड, अंबादास लडेवाड, सुप्रिया काळे, सारिका चव्हाण, राम पतंगे, किशन ढोणे, रईसाबेग अहमदखाँ, बाहोद्दीन, सतीश सोमसेटवार यांची निवड करण्यात आली.
या वेळी कदम सर, विजयकुमार शिंदे, सुभाष शिंदे, मनोज पाटील, हनुसिंग ठाकूर, बबलू काळे आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. सी. चव्हाण यांनी केले, तर आभार कदम सर यांनी मानले.