Next
‘पीएनबी मेटलाइफ’तर्फे ‘दामिनी’चे पुण्यात आयोजन
प्रेस रिलीज
Friday, February 22, 2019 | 04:03 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘पीएनबी मेटलाइफ’ या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या या कंपनीने ‘दामिनी’ या आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत दोन कार्यक्रमांचे पुण्यात आयोजन केले आहे. मुलींना सक्षम व सबळ करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

युद्धात अपंगत्व आलेल्या भारतीय जवानांसाठी देशातील सर्वात मोठी संस्था पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरसोबत या कंपनीने हातमिळवणी केली आहे. या अंतर्गत कंपनीतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या अपंग बॅडमिंटन खेळाडूंना आर्थिक साह्य पुरवले जाते. त्याशिवाय ‘पीएनबी मेटलाइफ’कडून दोन पराप्लेजिक सैनिकांच्या मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक साह्य केले जाते. या मुली पुण्यातील सिम्बॉयसिस इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट स्टडीजमधून एमबीएचे शिक्षण घेत आहेत.

स्टॉप सरम (लैंगिक छळ, बलात्कार व छळणूक) हे अभियान सुरू करण्यासाठी ‘पीएनबी मेटलाइफ’ने कॉव्हनंट सोशल सर्व्हिसेससोबतदेखील भागीदारी केली आहे.  प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या मदतीने लहान, युवा मुलींना लैंगिक वर्तणूक, लैंगिक छळ, वाईट कृती यांची माहिती व त्यापासून बचाव कसा करावा याची जागरूकता मिळावी यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले जाते. यामध्ये पुढील काही महिन्यांत १५ शाळांचा समावेश केला जाईल. याचे पहिले शिबिर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी आंध्र स्कूल, डेक्कन जिमखाना येथे झाले. यामध्ये चौथी ते आठवीच्या ६० विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती पुरवण्यात आली. १२ वर्षे व त्याखालील आणि १२ वर्षांपेक्षा जास्त अशा दोन वयोगटांमध्ये ही शिबिरे विभागण्यात आली आहेत.  

‘पीएनबी मेटलाइफ’चे चीफ मार्केटिंग ऑफिसर निपुण कौशल म्हणाले, ‘पुण्यामध्ये दोन महत्त्वाच्या सीएसआर उपक्रमांची सुरुवात करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. लहान मुलांच्याबाबतीत होणारे लैंगिक छळाच्या प्रकारांना आळा घातला जावा यासाठी जागरूकता निर्माण करणे यासाठी ‘स्टॉप सरम’ उपक्रम सुरू करत आहोत.  त्याचबरोबरीने अपंग बॅडमिंटन खेळाडूंना स्पर्धांमध्ये सहभागासाठी, दोन अपंग सैनिकांच्या मुलींना शिक्षण पूर्ण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेन्टरसोबत भागीदारी करून आर्थिक साह्य पुरविले जाते आहे.’   

मुलींचे शिक्षण, मासिक पाळीच्या काळात आरोग्य व स्वच्छता राखण्याबद्दल जागरूकता, ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्ये शिकवणे हे उपक्रम ‘दामिनी’अंतर्गत हाती घेण्यात आले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search